Anil Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) संस्थापक धिरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्यानंतर रिलायन्स या नावावरून वाद झाला होता. रिलायन्स हे नाव वापरण्याचा अधिकार नेमका मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मिळणार की त्यांचे बंधू अनिल अंबानी (Anil Ambani) यांना मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. शेवटी अंबानी कुटुंबाने रिलायन्स हे नाव दोघांनाही वापरता येईल, असा तोडगा काढला. आता हेच रिलायन्स ब्रँड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. उद्योजक अनिल अंबानी यांनी हिंदुजा उद्योग समूहावर (Hinduja Group) रिलायन्स नाव वापरल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे (NCLT) तक्रार केली आहे. 


रिलायन्स नाव वापरण्यापासून रोखण्याची मागणी


अनिल अंबानी यांची मालकी असलेल्या अनिल धीरूभाई अंबानी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (Anil Dhirubhai Ambani Ventures) या कंपनीने एनसीएलटीमध्ये एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत हिंदुजा ग्रुपचा मालकी हक्क असलेल्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स (Indusind International Holdings) या कंपनीला रिलायन्स हे नाव वापरण्यापासून रोखावे, अशी मागणी केली आहे. या प्रकरणावर एनसीएलटी मंगळवारी (20 ऑगस्ट) सुनावणी घेणार आहे. 


आयआयएचएलने केलं आहे रिलायन्स कॅपिटलचे अधिकग्रहण 


आयआयएचएलने नुकतेच कर्जदारांचे 9,641 कोटी रुपये देऊन रिलायन्स कॅपिटल्सचे अधिग्रहण केले होते. रिलायन्स कॅपिटलला 25 हजार कोटी रुपयांचे कर्ज चुकवता आले नव्हते. निलामीदरम्यान आयआयएचएलने रिलायन्स कॅपिटलला खरेदी केले होते. आयआयएचएलच्या निविदेला क र्जदारांनी जून 2023 मध्ये मंजुरी दिली होती. 


फक्त अंबानी कुटुंबाच वापरू शकतो रिलायान्स नाव 


अनिल अंबानी यांनी केलेल्या याचिकेत फक्त अंबानी कुटुंब रिलायन्स हे ब्रँड वापरू शकतो, असा दावा केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची जिओ फायनॅन्शीयल सर्व्हिसेस (Jio Financial Services) ही कंपनी लवकरच देशात आर्थिक सेवा चालू करणार आहे. असे असताना अंबानी बंधू वगळता अन्य कोणालाही रिलायन्स या नावाचा उपयोग करायला परवानगी देऊ नये, अशी मागणी अनिल अंबानी यांनी केली आहे. रिलायन्स नावाचा वापर करण्यास मंजुरी देताना आमची बाजी जाणून घेण्यात आली नव्हती, असा दावा मुकेश अंबानी यांनी केला आहे.


हेही वाचा :


Video : स्विमिंग पूल, प्रायव्हेट स्पा अन् सिनेमागृह, भाडं तब्बल 40 लाख, मुंबईतलं 'हे' घर आहे तरी कसं?


Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' होऊ शकते श्रीमंत, 1500 गुंतवून मिळू शकतील सव्वा लाख रुपये; जाणून घ्या नेमकं कसं?