Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) : कोरोनासारख्या या जीवघेण्या काळात आपली सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. यासाठी मोदी सरकारने सुरू केलेली स्वस्त प्रीमियम योजना प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना  तुमच्यासाठी उत्तम आहे.  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना  ही एक मुदत विमा योजना आहे. यामध्ये जर गुंतवणुकीनंतर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळणार आहेत. 


प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेला  Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) एक वर्षाचा जीवन वीमा आहे. या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण करता येते. कोणत्याही कारणामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला 2 लाख रुपयांची रक्कम मिळते. 


18 ते 50 वर्षे वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. भारताचे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.  55 व्या वर्षी योजना मॅच्युरिटी होते. या योजनेचे वार्षिक प्रिमीयम फक्त 330 रुपये आहे. 


जीवन ज्योती वीमा योजनेचे कागदपत्रे



  • आधार कार्ड

  • ओळखपत्र

  • बँकेचे पासबुक

  • मोबाईल नंबर

  • पासपोर्ट साईज फोटो