Gold Silver Price Today on 22 April 2023: साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला सर्वात महत्वाचा सण म्हणजे अक्षय्य तृतीया... ( Akshaya Tritiya 2023)आज देशासह राज्यात अक्षय्य तृतीया सण साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मियांसाठी आजचा सण खूप शुभ मानला जातो. आजच्या दिवशी नागरिकांचा सोने खरेदीकडे सर्वात जास्त कल असतो त्यामुळे आज सोने खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. सोन्याच्या विक्रमी वाढीनंतर आठवड्याच्या शेवटच्या  दिवशी त्यात घसरण झाली आहे.  सोने 425 रुपयांनी स्वस्त होऊन सोन्याची किंमत 60,191 रुपयांवर येऊन पोहोचली आहे.


मागील वर्षाच्या तुलनेत मात्र यंदा सोन्याच्या दरात दहा हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.  सोन्याचे दर (Gold Rate) 62 हजार रुपयांच्या वर जाऊन पोहोचल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने ही दरवाढ आवाक्याबाहेर आहे. सोन्याचे दर गगनाला भिडले असल्याने अनेक ग्राहकांनी कमी प्रमाणात सोने  खरेदी करून हा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केला आहे. ईद आणि अक्षय्य तृतीया हे दोन्ही सण एकत्र आल्याने सोन्याची मोठी खरेदी होईल असा अंदाज सोने व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात आहे. 


दुसरीकडे, चांदीबद्दल बोलायचे झाले तर, शुक्रवारीही चांदीच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव 646 रुपयांनी घसरून 74,773 रुपये प्रति किलोवर आला आहे. अशा स्थितीत आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने आणि चांदी दोन्हीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. तुम्हीही आज सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर  तुमच्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरावर एकदा नजर टाका -


देशातील दहा प्रमुख शहरांतील सोन्याचे दर



  • दिल्ली: 24 कॅरेट सोने - 61,300 रुपये, 22 कॅरेट सोने - 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम

  • मुंबई: 24 कॅरेट सोने - 61,150 रुपये, 22 कॅरेट सोने - 56,050 रुपये प्रति 10 ग्रॅम

  • कोलकाता: 24 कॅरेट सोने - 61,150 रुपये, 22 कॅरेट सोने - 56,050 रुपये प्रति 10 ग्रॅम

  • चेन्नई: 24 कॅरेट सोने - 61,150 रुपये, 22 कॅरेट सोने - 56,050 रुपये प्रति 10 ग्रॅम

  • लखनऊ: 24 कॅरेट सोने - 61,300 रुपये, 22 कॅरेट सोने - 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम

  • पाटणा : 24 कॅरेट सोने - 61,200 रुपये, 22 कॅरेट सोने - 56,100 रुपये प्रति 10 ग्रॅम

  • जयपूर : 24 कॅरेट सोने - 61,300 रुपये, 22 कॅरेट सोने - 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम

  • गुरुग्राम : 24 कॅरेट सोने - 61,300 रुपये, 22 कॅरेट सोने - 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम

  • नोएडा : 24 कॅरेट सोने - 61,300 रुपये, 22 कॅरेट सोने - 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम

  • अहमदाबाद : 24 कॅरेट सोने - 61,200 रुपये, 22 कॅरेट सोने - 56,100 रुपये प्रति 10 ग्रॅम


चांदीचे नवे दर जाणून घ्या 



  • दिल्ली - 76,900 रुपये प्रति किलो

  • मुंबई - 76,900 रुपये प्रति किलो

  • कोलकाता - 76,900 रुपये प्रति किलो

  • चेन्नई - 80,400 रुपये प्रति किलो

  • लखनऊ - 76,900 रुपये प्रति किलो

  • पाटणा - 76,900 रुपये प्रति किलो

  • जयपूर - 76,900 रुपये प्रति किलो

  • गुरुग्राम - 76,900 रुपये प्रति किलो

  • नोएडा - 76,900 रुपये प्रति किलो

  • अहमदाबाद - 76,900 रुपये प्रति किलो

    संबंधित बातम्या:


    अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीचे काय आहे विशेष महत्त्व..