नवी दिल्ली : भारतातील सर्वात नवीन विमान कंपनी, आकासा एअरने 1 नोव्हेंबरपासून पाळीव प्राण्यांना विमानात नेण्याची परवानगी दिली आहे, ज्यासाठी बुकिंग 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल. प्रवासी फ्लाइटमध्ये पाळीव कुत्री किंवा मांजर पिंजऱ्यात ठेवू शकतात असं कंपनीने जाहीर केले आहे. यामध्ये पाळीव प्राण्याचे वजन सात किलोपर्यंत असावे आणि प्रति व्यक्ती एक पाळीव प्राणी नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. 


आम्ही पाळीव प्राण्यांच्या धोरणाच्या पहिल्या टप्प्यात आम्ही पाळीव मांजरी आणि कुत्र्यांना परवानगी देऊ. पुढे जाऊन आम्ही आमचे पाळीव प्राणी धोरण हळूहळू वाढवू असं आकासा एअरचे सह-संस्थापक आणि मुख्य विपणन आणि अनुभव अधिकारी बेल्सन कौटिन्हो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवाय, सात किलो ते 32 किलो वजनाच्या पाळीव प्राण्यांसाठी एअरलाइन पाळीव प्राण्यांना त्यांच्या सामानाच्या होल्डमध्ये पिंजऱ्यात घेऊन जाईल असंही कौटिन्हो यांनी म्हटलं.


Akasa Air ने आकासा एअरच्या फ्लाइटमध्ये पाळीव प्राणी नेण्याच्या किंमतीचा तपशील अद्याप तरी उघड केलेला नाही. परंतु त्यांच्या ग्राहकांना पाळीव प्राण्यांसोबत प्रवास करताना सहज अनुभव घेण्यास मदत करतील असं सांगितलं आहे. 


याक्षणी Air India, Jet Airways, SpiceJet आणि Vistara आधीच पाळीव प्राण्यांना विमानात बसण्यास परवानगी देतात. इंडिगो आणि एअर एशिया कंपनी ज्या व्यक्ती अंध आहे आणि त्यांना मार्गदर्शक म्हणून जे त्यांचे पाळीव प्राणी त्यातही बहूत करुन कुत्र्यासारखे प्राणी असतात त्यांनाच परवानगी देत असतात.


सात ऑक्टोबर ही अकासा एअरच्या दिल्लीहून बंगळुरूला जाणाऱ्या पहिल्या फ्लाइटची तारीख आहे. तर या ऑक्टोबर अखेरपर्यंत दर आठवड्याला 300 उड्डाणे होण्याची कंपनीला अपेक्षा आहे  असं आकासा एअरचे सह-संस्थापक अधिक चीफ कमर्शिअल ऑफिसर प्रवीण अय्यर म्हणाले


आकासा एअरची या वर्षी मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, कोची, चेन्नई, दिल्ली, आगरतळा आणि गुवाहाटी ही आठ शहरे जोडण्याची योजना आहे. जर यामध्ये आम्ही यशस्वी झाली तर आणखी विमाने घेऊन विविध शहरे जोडू असं कंपनी व्यवस्थापनाकडून सांगितले आहे


एअरलाइनकडे सध्या 6 विमाने आहेत तर कंपनी दर 15 दिवसांनी एक विमान जोडणार आहे, असे आकासा एअरचे संस्थापक आणि सीईओ विनय दुबे यांनी सांगितले. "आम्ही या आर्थिक वर्षाच्या अखेरीस एकूण 18 विमाने, 5 वर्षांत 72 विमाने प्राप्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे." आकासा एअरच्या ताफ्याचा आकार मार्च 2023 च्या अखेरीस 18 विमानांचा असेल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.


Akasa Air ने ऑगस्ट 2022 मध्ये या सगळ्या योजना आणि कंपनीच्या कामाला जोर पकडला होता. दिवंगत प्रसिद्ध उद्योजक आणि शेअर बाजार गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची या कंपनीत मोठी हिस्सेदारी आहे. झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा या दोन्हींचा एकत्रित वाटा 45.97 टक्के आहे. तर झुनझुनवाला नंतर विनय दुबे यांचा यात सर्वाधिक 16.13 टक्के वाटा आहे. भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला देखील आपल्या पैजेमध्ये अपयशी होण्यास तयार होते, जोखीम घेण्यास कधीही घाबरत नव्हते. मग ते शेअर बाजार असो वा भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राबाबत.