Air India Boeing Airbus Agreement : इंडिगोनंतर टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने 470 नवीन विमाने खरेदी करण्यासाठी एअरबस-बोईंगशी करार केला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या एअर शोदरम्यान एअर इंडियाने विमान खरेदीचा करार केला आहे.


या प्रसंगी बोलताना टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, या ऐतिहासिक पाऊलामुळे एअर इंडियाची प्रगती आणि दीर्घकालीन यश आणखी वाढण्यास मदत होईल.आम्हाला खात्री आहे की या भागीदारीतून आम्ही आधुनिक विमान वाहतूक जगाला दाखवू शकू.


या वर्षी फेब्रुवारीमध्ये एअर इंडियाने विस्तार योजना पुढे नेत 470 विमाने खरेदी करण्याची घोषणा केली. आता हा करार पुढे नेत एअरलाइन्सने पॅरिस एअर शो दरम्यान बोईंग आणि एअरबससोबत या 70 अब्ज डॉलरच्या करार अंतर्गत विमाने खरेदी करण्यासाठी खरेदी करार केला आहे.


 






एअर इंडिया एअरबसकडून 250 तर बोईंगकडून 220 विमाने खरेदी करणार आहे. एअर इंडियाने 140 A320neo आणि 70 A321neo विमानांसाठी करार केला आहे. याशिवाय 34 A350-100 आणि सहा A350-900 वाइड-बॉडी जेटचा समावेश आहे. एअर इंडियाने फेब्रुवारीमध्ये एअरबेससोबत इरादा पत्रावर स्वाक्षरी केली होती.


190 737 MAX व्यतिरिक्त, बोइंग 20 787 ड्रीमलाइनर्स आणि दहा 777X जेट खरेदी करणार आहे. तसेच, एअरलाइन्सकडे 50 737 MAX आणि 20 787 ड्रीमलाइनर्ससह अतिरिक्त 70 विमाने खरेदी करण्याचा पर्याय आहे. दक्षिण आशिया क्षेत्रातील बोईंगसाठी ही सर्वात मोठी ऑर्डर आहे.


करारावर स्वाक्षरी करणारे एअर इंडियाचे एमडी-सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, फ्लीट नूतनीकरणासह विस्तारित करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे, एअर इंडिया पुढील पाच वर्षांमध्ये तिच्या सर्व नेटवर्क मार्गांपैकी सर्वात आधुनिक आणि कमी इंधन कार्यक्षम असेल. 


 






ही बातमी वाचा: