Air India: टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाइनने युरोपमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी एक नवीन ऑफर आणली आहे. ज्यामध्ये कंपनी स्वस्त दरात तिकिटे देत आहे. प्रवाशांना युरोपमधील काही शहरांमध्ये अत्यंत कमी किमतीत वन-वे किंवा राउंड ट्रिप तिकिटे मिळू शकतात. विशेषतः, ही स्वस्त तिकिटे युरोपमधील पाच शहरांसाठी आहेत. ज्यामध्ये युनायटेड किंगडमचाही समावेश आहे.


25 हजारांपासून 40 हजारांपर्यंतच्या फेऱ्यांचे तिकीट


निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया कंपनीने म्हटले आहे की, एअर इंडियाच्या फ्लाइट सेलमध्ये सर्व समावेशक भाडे उपलब्ध आहे. ज्याची किंमत राउंड ट्रिपसाठी 40,000 रुपये आणि एकेरी प्रवासासाठी 25,000 रुपये असणार आहे. 


कोणत्या शहरांसाठी स्वस्त तिकिटे उपलब्ध आहेत?


कोपनहेगन (डेन्मार्क)
लंडन हिथ्रो (युनायटेड किंगडम)
मिलान (इटली)
पॅरिस ( फ्रान्स)
व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)


तुम्ही स्वस्त तिकिटे कधी बुक करू शकता?


एअर इंडियाची ही स्वस्त तिकीट ऑफर 11 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहणार आहे. म्हणजे आणखी प्रवाशांनी तिकीट बूक करण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत. प्रवासी या ऑफर अंतर्गत 15 डिसेंबर 2023 पर्यंत प्रवास करू शकतात.


स्वस्त तिकिटे कुठे मिळतील?


एअर इंडियाच्या तिकीटांची विक्री सुरु आहे. यामध्ये तुम्ही एअर इंडियाच्या वेबसाइट iOS आणि Android मोबाइल अॅप्स तसेच अधिकृत ट्रॅव्हल एजंटद्वारे ही तिकिटे बुक करू शकता. विक्रीवर मर्यादित आसन पर्याय उपलब्ध आहेत. एअरलाइननुसार, ही तिकिटे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध असतील.


युरोपमधील या शहरांसाठी किती उड्डाणे चालवली जातात?


सध्या एअर इंडिया दिल्ली आणि मुंबईहून युरोपातील या पाच शहरांसाठी दर आठवड्याला नॉन-स्टॉप उड्डाणे चालवते. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की विविध शहरांमधील विनिमय दर आणि कर दरांमध्ये फरक असल्यामुळं या स्वस्त एअर इंडियाच्या तिकिटांचे दर थोडेसे बदलू शकतात.


महत्त्वाच्या बातम्या:


Israel-Palestine War: एअर इंडियाची इस्राइलला जाणारी उड्डाण 14 ऑक्टोबरपर्यंत रद्द, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला निर्णय