Agriculture News : शेतकर्यांचे (Farmers) उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. बिहार सरकारही (Bihar Govt) शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी बिहार सरकारनं आणखी एक नवीन योजना आणली आहे. ‘चहा विकास योजना’ असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत बिहार सरकार चहा उत्पादक शेतकऱ्यांना चहाच्या लागवडीवर अनुदान (subsidy) देत आहे. या योजनेनुसार चहाची लागवड (tea cultivation) करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान सरकारकडून दिलं जात आहे.
चहाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बिहार सरकारकडून 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान दोन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहे. ज्यामध्ये पहिल्या वर्षी लागवड केलेल्या रोपांपैकी 90 टक्के झाडे जगली तर दुसऱ्या वर्षी 25 टक्के प्रति हेक्टर अनुदान दिलं जाईल.
शासनाने नेमकी 'ही' योजना का सुरु केली
चहाच्या नवीन क्षेत्र विस्तारासाठी, प्रति हेक्टर प्रति युनिट किंमत 4.94 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ज्यावर शेतकऱ्यांना 50 टक्के (75:25) अनुदान मिळेल. म्हणजेच राज्य सरकार शेतकऱ्याला 2.47 लाख रुपये अनुदान देणार आहे. ही योजना सुरु करण्याचा उद्देश म्हणजे चहाचे उत्पादन वाढवणे हा आहे. त्यासाठी बिहार सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या योजनेसाठी कसा कराल अर्ज
‘चहा विकास योजने’साठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किशनगंज जिल्ह्यातील चहा उत्पादक शेतकरी बिहार सरकारच्या फलोत्पादन संचालनालयाच्या https://horticulture.bihar.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात. तिथे तुम्ही ‘चहा विकास योजना’च्या ‘अप्लाय’ लिंकवर क्लिक करुन आणि आवश्यक माहिती भरुन अर्ज करु शकता. अधिक माहिती हवी असल्यास संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक फलोत्पादन संचालकांशी संपर्क साधू शकता.
महत्त्वाच्या बातम्या: