Adani Transmission Q3 Results : अदानी ट्रान्समिशन लिमिटेडने (Adani Transmission)आर्थिक वर्ष 2022-23 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसर्या तिमाहीचे निकाल (Adani Transmission Q3 Results) जाहीर केले आहेत. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत अदानी ट्रान्समिशनच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानी ट्रान्समिशनचा नफा 478.15 कोटी रुपये होता. हा नफा 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत 283.75 कोटी रुपये होता.
तिसऱ्या तिमाहीत अदानी ट्रान्समिशनच्या महसुलात 15.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत महसूल 2623 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA रु. 1798 कोटी असून 28.9 टक्के जास्त आहे. कंपनीने म्हटले आहे की, नवीन ट्रान्समिशन लायन्स कार्यान्वित झाल्यामुळे कंपनीच्या महसुलात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत रोख नफ्यात 34 टक्क्यांनी वाढ झाली असून तो 955 कोटी रुपये झाला आहे. त्याच वेळी, या कालावधीत ईपीएस प्रति शेअर 4.26 रुपये आहे.
कंपनीने माहिती देताना सांगितले की, तिसर्या तिमाहीत, 99.75 टक्के सिस्टम उपलब्धतेसह 371 ckm चे ऑपरेशन सुरू केले आहे. तिसऱ्या तिमाहीत व्यावसायिक विभागातील मागणी वाढल्यामुळे विजेची मागणी 4.4 टक्क्यांनी वाढली आहे. यासोबतच वितरणामुळे होणाऱ्या तोट्यात 5.6 टक्के घट झाली आहे.
अदानी ट्रान्समिशनचे एमडी अनिल सरदाना म्हणाले की, कंपनी सतत नवीन टप्पे गाठत आहे. अदानी ट्रान्समिशन कंपनी आता ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशनमध्ये एक प्रमुख कंपनी झाली आहे. आव्हानात्मक आर्थिक वातावरण असूनही कंपनी विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी ट्रान्समिशन आणि वितरण कंपनी म्हणून आमचे अस्तित्व आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अदानी ट्रान्समिशन ही अदानी समूहाची वीज पारेषण आणि वितरण कंपनी आहे. कंपनीचे कामकाज 13 राज्यांमध्ये आहे आणि तिचे एकूण नेटवर्क 18,795 ckm आहे ज्यापैकी 15,371 ckm कार्यरत आहे. 3424 ckm वरील बांधकाम विविध टप्प्यात सुरू आहे. अदानी ट्रान्समिशन मुंबई आणि मुंद्रा SEZ मध्ये 12 दशलक्ष ग्राहकांना सेवा देत आहे.
हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे मागील 8-10 दिवसांत अदानी समूहाच्या शेअर दरात मोठी घसरण झाली. अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअर दरातही मोठी घसरण झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: