Adani Group New Project: अदानी समूहानं (Adani Group) मोठा निर्णय घेतला आहे. अदानी समुहानं आपल्या शेजारील देश भूतानमध्ये (Bhutan) ग्रीन हायड्रो प्लांट (green hydro project) उभारण्याचा निर्णय घेतलाय. यासंदर्भातील नवीन करार अदानी समुहानं भूतानशी केला आहे. नवीन उभारणयात येणारा ग्रीन हायड्रो प्लांट हा 570 मेगावॅटचा असणार आहे. 


रविवारी गौतम अदानी यांनी थिम्पू येथे भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे यांची भेट घेतली. यासोबतच त्यांनी शेजारील देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबतही चर्चा केली. गौतम अदानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली आहे. भूतानचे माननीय पंतप्रधान दाशो त्शेरिंग तोबगे यांच्यासोबत खूप आश्वासक भेट झाली. चुखा प्रांतात 570 मेगावॅटच्या ग्रीन हायड्रो प्लांटसाठी ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (DGPC) सोबत सामंजस्य करार केला असल्याची माहिती गौतम अदानी यांनी दिली आहे.


भूतानच्या पंतप्रधानांचा पायाभूत सुविधांसाठी व्यापक पुढाकार


भूतानचे पंतप्रधान देशभरात पायाभूत सुविधांसाठी व्यापक पुढाकार घेत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे गौतम अदानी म्हणाले. अदानी समूह भूतानमधील जलविद्युत आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांवर एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. कार्बन न्यूट्रल देश बनण्यासाठी हरित ऊर्जा व्यवस्थापनासोबतच या परिवर्तनीय योजनांमध्ये सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे अदानी यांनी सांगितले. भूतानच्या राजाला भेटून मला अभिमान वाटला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गौतम अदानी यांनी भूतानच्या राजाची भेट घेतली होती. तेव्हा गौतम अदानी म्हणाले होते की, अदानी समूह त्याच्या आनंदी असणाऱ्या शेजाऱ्यांसाठी हरित ऊर्जा पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान देण्यासाठी उत्सुक आहे.


उद्योगपती गौतम अदानी यांनी नुकताच मोठा व्यवहार केला होता. अदानी ग्रुपच्या (Adani Group) अंबुजा सिमेंटने पेन्ना सिमेंट (Penna Cement) इंडस्ट्रीज लिमिटेड खरेदी करण्याची घोषणा केली आहे. अंबुजा सिमेंटने पेन्ना सिमेंटमधील 100 टक्के हिस्सा 10422 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. यामुळं आता अंबुजा सिमेंटची वार्षिक सिमेंट उत्पादन क्षमता 14 दशलक्ष टनांनी वाढून वार्षिक 89 दशलक्ष टन झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! अदानी समुहानं केली 'या' मोठ्या कंपनीची खरेदी, 10422 कोटींचा व्यवहार