Media Person Of The Year Award : IAA (International advertisg association) तर्फे आयोजित केलेल्या  यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सोहळ्यात एबीपी नेटवर्कनं बाजी मारली आहे. एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे यांना मीडिया पर्सन ऑफ द ईअर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आयएएतर्फे अविनाश पांडे यांना सन्मानित करण्यात आले आहे.


अविनाश पांडे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर एबीपी नेटवर्कचे आभार मानले. अविनाश पांडे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, "हा पुरस्कार एबीपी नेटवर्कच्या सर्वोत्तमतेवर मोहोर उमटवणारा पुरस्कार आहे. याचा मला अभिमान आहे".


 






भारतीय मार्केटिंग, जाहीरात आणि मीडिया क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींना आयएए लीडरशीप अवॉर्डनं दरवर्षी गौरवलं जात.  देशातील कटर्पोरेट क्षेत्राशी संबंधित जवळपास 500 व्यक्तींमधून 15 प्रतिभावंत व्यक्तींची या पुरस्कारांसाठी निवड केली जाते. बँकिंग, फूड, रिटेल, ई कॉमर्स, सोशल मीडिया, गेमिंग, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल यासह अन्य क्षेत्रातील व्यक्तींची यासाठी निवड केली जाते. यंदाचं हे या पुरस्कारांचं नववं वर्ष आहे. 


मुंबईच्या पंचतारांकीत हॉटेलात यंदाचा हा सोहळा पार पडला. ज्यात कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांसह बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंहची विशेष उपस्थिती होती. रणवीरला 'ब्रँड एंडॉर्सर ऑफ द इयरच्या' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. र .या अगोदर ENBA या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात अविनाश पांडे यांना बेस्ट सीईओ या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.  तसेच एबीपीच्या मास्टर स्ट्रोक शो ला  'बेस्ट करंट अफेअर्स' पुरस्कार आणि 'अनकट' या कार्यक्रमाला बेस्ट करंट अफेर्स कार्यक्रमाला सुवर्णपदकाने सन्मानित  करण्यात आले आहे. 


संबंधित बातम्या :