7th pay commission : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील वाढती महागाई पाहता जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात सरकार महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.


जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट मिळू शकते.


दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांवर होणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात हा भत्ता दिलासा देणारा ठरणार आहे. सर्वसाधारणपणे 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून महागाई भत्ता वाढवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, अशा स्थितीत जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट मिळू शकते.


'या' आधारावर सुधारणा केली जाते


केंद्र सरकार किरकोळ महागाईच्या आकडेवारीच्या आधारे जानेवारी आणि जुलै महिन्यात वर्षातून दोनदा DA आणि DR मध्ये सुधारणा करते. देशातील महागाई सरकारने ठरवून दिलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त झाली आहे. किरकोळ महागाईचा दर मार्चमध्ये 6.1 टक्क्यांवरून 6.95 टक्क्यांवर पोहोचला होता, तर एप्रिलमध्ये तो 7.5 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा 18 महिन्यांचा उच्चांक असेल.


4 टक्के वाढ शक्य


एप्रिलमधील किरकोळ महागाईची आकडेवारी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, ज्या वेगाने महागाई वाढत आहे, त्या पाहता कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते. जुलैमध्ये कर्मचाऱ्यांना चार टक्क्यांपर्यंत डीए वाढवता येईल, असा अंदाज आहे. अलीकडेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता, तो आता 34 टक्के झाला आहे. केंद्र सरकारने मार्च 2022 अखेर आपल्या कर्मचाऱ्यांच्या 'डीए'मध्ये वाढ केली होती. नवीन दर 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत.


संबंधित बातम्या


7th Pay Commission : खूशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार फरकाची रक्कम, थकबाकीचा तिसरा हप्ता जूनच्या वेतनात


7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! नियमांत केले बदल, मुलांना मिळणार 1.25 लाखांपर्यंत पेन्शन