5000 Rupee Notes : सेंट्रल बँकेनं (central bank) एक मोठी घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात 5000 रुपयांच्या नोटा चलनात येणार आहेत. या नोटा एक नवीन पॉलिमर प्लास्टिक चलन (Polymer Plastic note) बँक नोटा म्हणून वापरात येणार आहे. उत्तम सुरक्षा आणि होलोग्राम वैशिष्ट्यांसाठी मध्यवर्ती बँक सर्व विद्यमान बँक नोटांची पुनर्रचना करणार आहे. पण 5000 रुपयांच्या नोटा कोणत्या देशात येणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर आपल्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तानमध्ये 5000 रुपयांची नोट चलनात येणार आहे.


अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न


भारताचा शेजारी देश पाकिस्तान आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी जागतिक बँकेकडून कर्ज घेणे आणि देशांतर्गत प्रत्येक छोटे-मोठे पाऊल उचलत आहे. आता पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेने एक मोठी घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरीस नवीन पॉलिमर प्लॅस्टिक चलन बँक नोट सादर केली जाईल. उत्तम सुरक्षा आणि होलोग्राम वैशिष्ट्यांसाठी मध्यवर्ती बँक सर्व विद्यमान बँक नोटांची पुनर्रचना करणार आहे. पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात (financial crisis) आहे. महागाईत (Inflation) मोठी वाढ झालीय. या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान इतर देशांकडे मदतची मागणी देखील करताना दिसत आहे.


जुन्या नोटा पाच वर्षे चलनात राहणार


स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद यांनी इस्लामाबादमधील बँकिंग आणि वित्तविषयक सिनेट समितीला सांगितले की, या वर्षी डिसेंबरपर्यंत सर्व विद्यमान कागदी चलनी नोटा नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांसह पुन्हा डिझाइन केल्या जात आहेत. 10, 50, 100, 500, 1000 आणि 5000 रुपयांच्या नवीन डिझाईन केलेल्या बँक नोटा डिसेंबरमध्ये जारी केल्या जाणार आहेत. जुन्या नोटा पाच वर्षे चलनात राहतील आणि केंद्रीय बँक त्या बाजारातून काढून टाकतील. स्टेट बँकेच्या गव्हर्नरांनी सिनेट समितीला सांगितले आहे. नवीन पॉलिमर प्लॅस्टिक बँक नोट एका मूल्यात लोकांसाठी जारी केली जाईल आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास इतर मूल्यांमध्येही प्लास्टिक चलन जारी केले जाईल असे जमील अहमद म्हणाले.


40 देश वापरतायेत पॉलिमर प्लॅस्टिकच्या नोटा 


सुमारे 40 देश सध्या पॉलिमर प्लॅस्टिकच्या नोटा वापरतात, ज्या बनावट बनवणे कठीण आहे. त्यात होलोग्राम आणि पारदर्शक खिडक्या यांसारखी अधिक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. ऑस्ट्रेलिया हा 1998 मध्ये पॉलिमर नोटा आणणारा पहिला देश होता. 


महत्वाच्या बातम्या:


पाकिस्तानचे चलन बदलणार? आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानात नेमकं चाललंय काय?