Ashneer Grover New Business: उपचारासाठी पैशांची गरज असणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. BharatPe सोबत झालेल्या वादानंतर भारतपेचे (Bharat Pay) माजी सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) हे नवीन इनिंग सुरु करत आहेत. ग्रोव्हर हे आता नवीन कंपनीच्या माध्यमातून गरजू लोकांना उपचारासाठी त्वरीत 5 लाखांचे त्वरित कर्ज देणार आहेत. नवीन अॅपच्या माध्यमातून हे कर्ज देण्यात येणार आहे.
कोणत्या रुग्णांना होणार या कर्जाचा लाभ?
दरम्यान, अश्नीर ग्रोव्हर यांनी घेतलेला निर्णय गरजू रुग्णांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. अनेकांना उपचार करायचे असतात, पण पैशांची कमतरता असते. त्यामुळं पैशांची गरज असणाऱ्या व्यक्तिंसाठी पाच लाखांचे कर्ज देण्याचा ग्रोव्हर यांचा निर्णय कौतुकास्पद असल्याचं बोललं जातयं.
कोणत्या रुग्णांना मिळणार कर्ज? मिळालेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांना या कर्जाचा लाभ घेता येणार नाही. फक्त Zeropay च्या पार्टनर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांनाच या कर्जाचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, नवीन ॲपला Zeropay असं नाव देण्यात आलं आहे. हे अॅप थर्ड युनिकॉर्नने विकसित केलं आहे. सध्या हे अॅप टेस्टिंग मोडमध्ये आहे. गरजू रुग्णांना दिल्लीतील ग्रोव्हरची कंपनी NBFC मुकुट फिनवेस्टच्या सहकार्यानं कर्ज देण्यात येणार आहे.
झपाट्यानं वाढतायेत आरोग्यविषयक समस्या
भारतात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपचारांसाठी पैशांची गरज लागते. झपाट्यानं आरोग्यविषयक समस्या वाढतायेत. त्याप्रमाणत खर्च देखील वाढतोय. अशातच अश्नीर ग्रोव्हरने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. वेळेत पैशांची उपलब्धता झाल्यामुळं रुग्णांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
आरोग्य सेवेवरील खर्च कमी होणार, 100 औषधे होणार स्वस्त; केंद्र सरकारचा मोठा निर्णय