अहमदाबाद (गुजरात)  २ जानेवारी : भारतीय अन्नपरंपरेत खोलवर रुजलेल्या रिक्स ग्लोबल फूड्सने ‘घीयोनेझ’ या जगातील पहिल्या तुपावर आधारित स्प्रेडचे अभिमानाने लाँच जाहीर केले आहे. पारंपरिक पोषणमूल्ये आणि आधुनिक चवीची सांगड घालणारे घीयोनेझ हे स्प्रेड्सच्या श्रेणीत एक मोठे नवोन्मेषात्मक पाऊल असून, आजच्या सजग ग्राहकांसाठी आरोग्यदायी चव नव्याने परिभाषित करते.

Continues below advertisement

पुढील पाच वर्षांत घीयोनेझला अखिल भारतीय ब्रँड म्हणून उभे करण्याचे उद्दिष्ट रिक्स ग्लोबल फूड्सने ठेवले आहे. याची सुरुवात गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश–छत्तीसगड या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून केली जाणार असून, त्यानंतर इतर महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये विस्तार केला जाईल. ब्रँडच्या वाढ धोरणात किरकोळ व मॉडर्न ट्रेड, HoReCa (हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफे), तसेच ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. पुढील टप्प्यात, भारतीय डायस्पोरा असलेल्या प्रदेशांमध्ये आणि आरोग्यदायी अन्न पर्यायांची मागणी वाढत असलेल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याचा कंपनीचामानस आहे. 

कंपनीने उत्पादन संशोधन व विकास, उत्पादन सुविधा उभारणी, प्रीमियम A2 गिर गायीच्या तुपाची सोर्सिंग आणि ब्रँडिंगमध्ये आधीच मोठी गुंतवणूक केली आहे. संपूर्ण भारतातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षमतेत वाढ करण्याची योजना असून, गुणवत्ता, अन्नसुरक्षा आणि कार्यक्षमतेचे कठोर निकष कायम ठेवले जातील. यामुळे किरकोळ तसेच संस्थात्मक चॅनेल्समध्ये सातत्यपूर्ण पुरवठा सुनिश्चित होईल. 

Continues below advertisement

विद्यमान मेयोनेझ ब्रँड्सशी थेट स्पर्धा करण्याऐवजी, घीयोनेझ ‘तुपावर आधारित स्प्रेड’ ही पूर्णपणे नवी श्रेणी निर्माण करत आहे. जागतिक स्तरावर प्रथमच सादर होत असलेल्या या उत्पादनाचे लक्ष प्रमाणावर नव्हे, तर नवोन्मेषाद्वारे नेतृत्व निर्माण करण्यावर आहे. लाँचबाबत बोलताना रिक्स ग्लोबल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्री. केहुल शाह म्हणाले,“घीयोनेझ आमच्या या विश्वासाचे प्रतीक आहे की आरोग्य आणि चव एकत्र जाऊ शकतात. पिढ्यान्‌पिढ्या तूप हे भारतीय घरांमध्ये शुद्धता आणि पोषणाचे प्रतीक राहिले आहे. घीयोनेझच्या माध्यमातून आम्ही ही परंपरा आजच्या वेगवान जीवनशैलीला साजेशा स्वरूपात पुढे नेत आहोत—चविष्ट, सोयीस्कर आणि पौष्टिक. भारतातचनव्हे तर जगभरातील प्रत्येक घरात तुपावर आधारित पोषण पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे.”

घीयोनेझची वैशिष्ट्ये म्हणजे—

  •  पाम ऑइल किंवा कोणतेही वनस्पती तेल नाही
  • पारंपरिक भारतीय पोषणावर आधारित सूत्र
  •  आधुनिक व बहुपयोगी वापर
  •  तीन पिढ्यांचा तुपाचा अनुभव

यामुळे ते पारंपरिक मेयोनेझला एक अनोखा आणि आरोग्यदायी पर्याय ठरते, जो चवीशी कोणतीही तडजोड न करता आरोग्याबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांना आकर्षित करतो. उत्तम अन्ननिवडीबाबत जागरूकता वाढत असताना, रिक्स ग्लोबल फूड्स टप्प्याटप्प्याने आणखी नाविन्यपूर्ण तुपावर आधारित उत्पादने सादर करण्याची योजना आखत आहे, ज्यातून तुपाचा अनुभव आधुनिक अन्नप्रकारांमध्ये विस्तारला जाईल.

रिक्स ग्लोबल फूड्स ही पारंपरिक पोषणमूल्ये आधुनिक पद्धतीने पुनरुज्जीवित करण्यासाठी कटिबद्ध अशी दूरदृष्टी असलेली भारतीय कंपनी आहे. तीन पिढ्यांच्या तुपा उत्पादनातील सखोल अनुभवाच्या जोरावर, नावीन्य, प्रामाणिकपणा 

For more information, please visit www.gheeyonnaise.com

Disclaimer : This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.