वार मंगळवार,दि. ०९/०७/२०२४ रोजी राजगंगा फर्टिलायझर्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचा उत्पादन उदघाटन प्रसंग पार पडला. त्यामध्ये या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आलेल्या जिल्हाधिकारी साहेबांनी  सर्व प्रेक्षकांना संबोधित केले. त्यानी या प्रसंगी सांगितले की, शेती टिकवण्यासाठी व उत्पादन अधिक वाढीसाठी जिवाणुयुक्त सेंद्रीय खत वापरणे काळाची गरज झाली आहे. शेती व्यवसाय सुधारण्यासाठी आणी कृषी साखळी मजबूत करण्यासाठी सेंद्रिय खते वापरणे अनिवार्य आहे. माजी साखर आयुक्त मा. श्री.शेखर गायकवाड साहेब यांनी संबोधित करताना संगितले की, पारंपारिक शेतीला शेती व्यवसायात बदलवावे व सेंद्रीय खतांचे महत्त्व जाणून त्यांचा योग्य रित्या वापर करून घेऊन जमिनीचा पोत वाढवावा ही सूचना त्यांनी शेतकरी व व्यावसायिक बांधवांना केली.


मा. श्री. किशोर राजे निंबाळकर साहेब माजी अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी आपल्या भाषणात सांगितले की या कंपनी मार्फत सेंद्रिय खतांचे उत्पादन करून ते खते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यत पोहोचवावे व शेतीचे उत्पादन वाढवावे ही बाब त्यांनी दर्शवली.


ह्या उदघाटन प्रसंगी  प्रसिद्ध उद्योगपती मा. श्री. प्रकाश धारीवाल साहेब, एनआयए (भारत सरकार)अध्यक्ष मा. श्री. राजेश शुक्ला साहेब, सहकार आयुक्त मा. श्री. दीपक तावरे साहेब, दीपक फर्टिलायझर्स चे मा. श्री. विजयराव पाटील साहेब (निवृत्त उपाध्यक्ष), मा. श्री. विश्वराज महाडिक साहेब चेअरमन- भीमा सहकारी साखर कारखाना, आ. श्री. उप्पल शाह सहसंस्थापक, जे के शुगर्स व असे अनेक मान्यवर उपस्थित होते.


आमचे मार्गदर्शक व राजगंगा ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष मा श्री डॉ राजेराम प्रभू घावटे ह्यांना शेतकरी बांधवांच्या बाबतीत कळकळ होती आणि   समाजिक बांधिलकीची जाणीव असल्या कारणामुळे ह्या संकल्पनेने जन्म घेतला. ह्या सर्व प्रवासात त्यांना व्यवस्थापकीय संचालक प्रसाद राजेराम घावटे यांनी साथ दिली.


राजगंगा ग्रुप ची दृष्टी, ध्येय व मूल्ये च्या आधारावरती आज राजगंगा फर्टिलायझर्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड चे काम कार्यरत आहेत. एक उद्दिष्टपूर्ण आणी जनहित कार्य करण्यासाठी आम्ही स्वप्नशील आहोत.