नागपूर, 13 नोव्हेंबर : वयाच्या 27व्या वर्षी पहिल्यांदा आमदार बनून महाराष्ट्राच्या विधानसभेत दिग्गजांकडून राजकारण आणि प्रशासकीय कार्यकुशलतेचे धडे घेणारा एक सामान्य आमदार ते भंडारा-पवनी विधानसभेसाठी 3500 हजार कोटीहून अधिकचा निधी त्याच विधानमंडळातील मंत्रीमंडळाकडून खेचून आणणारा धुरंधर म्हणजे नरेंद्र भोजराज भोंडेकर… वय वर्षे 27 असताना 2009मध्ये भंडाऱ्यातून शिवसेनेकडून विधानसभा लढवली आणि जिंकलीही. राजकीय डावपेच, प्रशासकीय कामाचा अनुभव हे सारे माहित नसल्याने नरेंद्र भोंडेकरांनी  वर्गातील एखाद्या हुशार वि‌द्यार्थ्यासारखे हे सारे शिकण्यावर लक्ष केंद्रीत केले. 


2014 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र भोंडेकरांना पराभव पत्कारावा लागला. या काळात लवकरच जनतेला चूक लक्षात आली पण वेळ गेलेली होती. एका चुकीच्या मताने भंडाऱ्याला कधी नव्हे ते एवढ्या मागे लोटलं.पण भंडारा आणि पवनीच्या सुजान जनतेने मात्र २०१९ मध्ये आपली चूक सुधारली आणि कुठल्याही पक्षाविना निवडणुकीत अपक्ष असलेल्या नरेंद्र भोंडेकरांना भरघोष मताने निवडून आणले. मात्र या काळात 2020 मध्ये कोरोनाची साथ आली. दोन वर्ष कोरोनात गेलीत. विकासकामे थांबली. पण कोरोनाचे संकट दूर होताच बऱ्यापैकी प्रशासकीय कामाकाजाचा अनुभव असल्यामुळे नरेंद्र भोंडेकरांनी भंडारा- पवनीसाठी विकास कामांची रांगच लावली. 


 निसर्ग सौंदर्याचे आशीर्वाद मिळालेल्या भंडारा-पवनीमध्ये जलपर्यटनातून रोजगाच्या मोठ्या संधी होऊ शकतात हा विचार जोपासून या प्रकल्पासाठी शासनाकडून निधी आणला.महिलांसाठी स्वतंत्र हॉस्पीटल, बगीच्यांचे सौंदर्यीकरण, उपसा सिंचन योजना, नवीन प्रशासकीय इमारती, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ई-लायब्ररी या आणि अशा अनेक कामांमुळे येणाऱ्या काळात आपल्या भंडारा-पवनीचा कायापालट करण्याचा निर्धार करतानाच या सर्व कामांच्या केंद्रस्थानी रोजगाराचा मुद्दा प्रकर्षाने नरेंद्र भोंडेकर यांनी ठेवला आहे.
 
भंडारा-पवनी विधानसभा मतदार संघात पहिल्यांदाच साडेतीन हजार कोटींची कामे आणण्याचा विक्रम नरेंद्र भोंडेकरांनी केला. दूरदृष्टी ठेवून उभारलेल्या या प्रकल्पांमुळे तरुणाईच्या हाताला हक्काचा रोजगार मिळणार आहे.  नरेंद्र भोंडेकर यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आणलेल्या अनेक कामांपैकी काही ठराविक 25 कामांचा या निमित्ताने एक छोटासा आढावा…


महिला रुग्णालय भंडारा


भंडारा शहरामध्ये प्रस्तावित महिला रुग्णालयाला मंजुरी प्रदान करून 90 कोटींचा भरीव निधी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपलब्ध करून दिला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्हा वेगळा झाल्या कारणाने महिला रुग्णालय हे गोंदिया जिल्ह्याच्या वाट्याला गेले होते. तेव्हापासून महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची प्रतीक्षा होती. आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांनी यासाठी अथक प्रयत्न केले आणि वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा केला. त्याचे फळ म्हणून आज भंडारा जिल्ह्यात स्वतंत्र महिला रुग्णालय बनण्यास सुरवात झाली आहे. पवनी उपजिल्हा रुग्णालय


विदर्भाची काशी पवनी या पावन भूमीला एक विशिष्ट दर्जा मिळावा यासाठी स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पवनी तालुक्यासाठी नविन उपजिल्हा रुग्णालय निर्माण करण्याचा निर्धार करून त्यासाठी तब्बल 90 कोटी रुपयांचा भक्कम निधी उपलब्ध करून दिला आहे. हे रुग्णालय लवकरच सुरु होऊन कार्यान्वित होईल. या रुग्णालयात आधुनिक उपचार पद्धती राहणार आहे.


भंडारा तलाव सौंदर्यीकरण आणि बगीचा निर्माण 


निसर्गाने मुक्तहस्ताने भरभरून सौंदर्याची लयलूट केलेला जिल्हा भंडारा…  तलावाच्या या जिल्ह्यातील तलावांचे खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि तिथे बगीचा निर्माण करण्याचे काम आमदार नरेंद्र भांडेकर यांनी
हाती घेतले आहे. यासाठी तब्बल 120 कोटींचा निधी प्राप्त करून दिला आहे. शहराबाहेरील तलावावर ढिवर समाजबांधवांना उदरनिर्वाहासाठी व्यवस्था करून दिली. 


भंडारा जिल्हा रुग्णालय आधुनिकीकरण


आपात्कालीन वैद्यकीय स्थितीमध्ये भंडारा जिल्हा रुग्णालयात सुविधा नसल्याने नाईलाजाने अनेक रुग्णांना नागपूरला जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी आमदार श्री. नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेतले व त्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी देखील आणला. या रुग्णालयाच्या आधुनिकीकरणामुळे रुग्णांना नागपूरला न जाता भंडाऱ्यातच संपूर्ण आरोग्य तपासणी आणि आरोग्यविषयक सोयी उपलब्ध होतील.


अड्याळ ग्रामीण रुग्णालय


भंडारा-पवनी मार्गावरील अड्याळ या गावातील आरोग्य यंत्रणेवर परिसरातील अनेक लहान खेडी विसंबून आहेत. त्यामुळे अड्याळ येथे ग्रामिण रुग्णालयाची निर्मिती करण्यासाठी आमदार श्री. नरेंद्र भोंडेकर यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी २४ कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर केला. 


भंडारा-पवनी नगरपालिका शाळा


आजच्या स्पर्धेच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात कुणीही बालक परिस्थितीमुळे चांगले दर्जेदार शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये यासाठी आमदार श्री. नरेंद्र भोंडेकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी भंडारा आणि पवनीतील नगरपालिकांच्या शाळांना आधुनिक करण्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला. या शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थी खासगी शाळांप्रमाणेच उत्तम शिक्षण अगदी मोफत घेऊ शकणार आहेत. भंडारा पवनी मंदिर, बुध्दविहार आणि ई-लायब्ररी आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांच्या संकल्पनेतील ए्क महत्वाचे काम म्हणजे मंदिर आणि बुद्ध विहारामध्ये ई- लायब्ररी निर्माण करण्याचे. मंदिर आणि बुद्धविहारांमध्ये शांतता असते आणि मन प्रसन्न असते अशा वातावरणात विद्यार्थ्यांना सोयीचे म्हणून त्या ठिकाणी ई-लायब्ररीचे काम आमदार भोंडेकर यांनी केले. यासाठी त्यांनी 12 कोटींचा निधी मिळवून दिला आहे. 


जिल्हाधिकारी, दंडाधिकारी आणि तहसील कार्यालय


110 कोटींच्या भरघोस निधीमधून भंडारा जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा बळकट करण्यासाठी आणि प्रशासनातील लोकांना एक नविन वातावरण निर्मिती मिळावी यासाठी आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकाराने भंडारा शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, दंडाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाची नवीन इमारत निर्माण केली जाणार आहे. 


सिवरेज प्रकल्प


घरांतून, उद्योगातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांनी दूरदृष्टीकोतून भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रामध्ये सिवरेज प्रकल्प आणला. यासाठी आमदार भोंडेकर यांनी ३५० कोटींचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. 


धारगाव उपसिंचन योजना


400 कोटींचा प्रकल्प असणारी ही योजना म्हणजे हजारो शेतकऱ्यांच्या आणि शेकडो हेक्टर जमिनीला जीवनदायी योजना म्हणून कार्य करणार आहे. या योजनेमुळे पाण्याची आवश्यता असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि शेकडो-हजारो हेक्टर जमिनीला लाभ मिळेल.


दाभा-सांगवारी उपसा सिंचन योजना


१३५ कोटींचा प्रकल्प असणारी ही योजना म्हणजे हजारो शेतकऱ्यांच्या आणि शेकडो हेक्टर जमिनीला जीवनदायी योजना म्हणून कार्य करणार आहे. जेणेकरून जिथे पाण्याची आवश्यता आहे अशा ठिकाणी या योजनेचा शेतकऱ्यांना आणि शेकडो-हजारो हेक्टर जमिनीला लाभ मिळेल.


पी.डब्लु.डी., मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि पुल


पी.डब्लु.डी., मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि पुल या कामांसाठी आमदार श्री. नरेंद्र भोंडेकर यांनी तब्बल 300 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दुरावस्था झालेले रस्ते आणि पूल यांचे नूतनीकरण आणि अद्ययावतीकरण होणार आहे. ज्यामुळे दळणवळण सोयीचे होईल आणि प्रवास आरामदायक होईल.


अनुसूचित जाती वि‌द्यार्थी आश्रम शाळा


कोंढा येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नविन अनुसूचित जाती विद्यार्थी आश्रम शाळा तयार होत आहे. ज्यासाठी 40 कोटींचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये विद्यर्थ्यांना सर्व मूलभूत सुविधा मिळतील आणि त्यांच्या गरजा पूर्ण होतील.


भंडारा न्यायालय


आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांनी प्रशासकीय कामांच्या बळकटीकरणासाठी महत्वाचा पुढाकार घेतला आहे. 52 कोटी रुपयांच्या निधीमधून भंडारा येथील न्यायालयाची इमारत साकारली आहे. विशेष म्हणजे आमदार भोंडेकर यांनीच या नविन इमारतीचा शुभारंभ केला.


भंडारा जिल्हा नाट्यगृह


सांस्कृतिक कलेचा वारसा जोपासण्यासाठी आणि कलेला वाव मिळण्यासाठी भंडारा जिल्ह्यात नाट्यगृह उभारण्याचे काम आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांनी केले आहे. या नाट्यगृहाकरिता ३२ कोटींचा निधी प्राप्त करून देऊन त्यांनी जणु लोककलेची जोपासनाच केली आहे.


ओबीसी विद्यार्थी वसतिगृह


मागासवर्गीय अर्थात ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळावे यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्रामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला मंजूरी मिळवून दिली. यासाठी त्यांनी 30 कोटींचा निधी प्राप्त करून दिला आहे.




(Disclaimer: ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.)