मुंबई: महाराष्ट्राच्या नागपुरमध्ये ब्राम्हण परिवारात देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला. देशाविदेशातल्या प्रतिष्ठीत संस्थामधून शिक्षण प्राप्त करूनसुद्धा महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढण्याचा वसाच त्यांनी घेतला आहे.


उच्चवर्णीय प्रवर्गात जन्मलेले तरीसुद्धा समाजातील प्रत्येक असहाय, दलित आदिवासी आणि ओबीसी यांसाठी प्रेम आणि संवेदना देवेंद्र फडणवीसांमध्ये आहेत, त्यांच्या न्यायहक्कासाठी वेळोवेळी खंबीरपणे आवाज उठवला. छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये जन्मलेल्या आणि त्यांच्या विचारांचा वसा जपणाऱ्या फडणवीसांनी गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आबेडकरांचे विचासुधद्धा आत्मसात केले. म्हणूनच आरक्षित समाजातील मागासवर्गीयांची वेदना ते समजतात.


विरोधक वारंवार त्यांच्यावर टिका करत असतात की त्यांनी मराठा समाजासाठी आणि तरूणांसाठी काय केले? फडवीसांसारखा संवेदनशील आणि मराठा समाजासाठी असलेली आत्मियता यातून त्यांनी मराठा समाजासाठी खूप काही केले. परंतु त्याचा कधीच गाजावाजा केला नाही, कारण मराठा समाजाचं दुःख ते जाणतात.


देवेंद्र फडणवीस यांनी 70,000 हून जास्त मराठा तरूणांना त्यांच्या पायावर उभ राहण्यासाठी मदत केली. शिक्षण आणि त्याचं महत्व जाणणाऱ्या फडणवीसांच्या प्रयत्नातून UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमधून राज्यातील 51 IAS आणि 304 पहिल्या श्रेणीतील अधिकारी यासाठी विद्यार्थांची निवड करण्यात आली.


(Disclaimer: ABP Network Pvt. Ltd. किंवा ABP Live कोणत्याही प्रकारे या लेखातील मजकूर किंवा येथे व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करत नाही. वाचकांना विवेकबुद्धीचा वापर करण्याचा सल्ला आहे).