PBKS vs MI IPL 2025: काल झालेल्या मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यात पंजाब ने मुबई वर विजय मिळवून अव्वल स्थान मिळविले...ते आता अव्वल एक आणि दोन मधेच राहतील..उद्या बंगळूर संघ जर विजयी ठरला तर या स्पर्धेत इतिहास घडेल....नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून मुंबई संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले..पण आज श्रेयस याने अत्यंत हुशारीने गोलंदाजीत बदल करून सुरवातीपासून मुंबई मजबूत फलंदाजीवर अंकुश ठेवून त्यांना कायम दबावात ठेवले....रोहित आणि रिक्लटन याने ३१ चेंडूत ४५ धावांची भागीदारी करून आश्वासक सुरुवात केली.. पण रिक्लटन बाद झाल्यावर  रोहित ने पण  अधिक वेळ न घेता तंबूचा रस्ता पकडला...आज मुंबई संघाकडून पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव याने अत्यंत हुशारीने फलंदाजी केली..गेल्या काही सामन्यात तो खेळपट्टी विचारात घेऊन आपली बॅट चालवित आहे...आज सुद्धा त्याने षटकार मारण्यापेक्षा जमिनीलगत फटके खेळून डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला..रोहित  आणि हार्दिक सोबत त्याने महत्त्वाच्या छोट्या भागीदारी करून मुंबई संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

Continues below advertisement


आज श्रेयस याने गोलंदाजीत केलेले बदल त्याचा गृहपाठ पक्का होता हे दर्शवित होते...सूर्यकुमार शेवटच्या षटकापर्यंत मैदानात असून देखील तो धोकादायक होणार नाही हे पाहिले. आर्षदीप,मार्को जॉन्सन यांचा अत्यंत खुबीने वापर केला...
१८५ धावांचे आव्हान घेऊन उतरलेला पंजाब संघ आज श्रेयस आणि पाँटिंग यांची देहबोली घेऊन उतरला...सुरवातीपासून आक्रमण हाच धर्म असल्यासारखे खेळत होते...प्रभ सिमरन लवकर बाद झाल्यावर प्रियांश आर्यन आणि इंग्लीस यांनी आक्रमकतेचा वसा घेऊन ५९ चेंडूत १०९ धावांची भागीदारी करून सामना एकत्रफी केला...आज प्रियांश याने ऑफ साइड वर जे ड्राईव्ह मारले ते सौरभ गांगुलीची आठवण देऊन गेले....आमच्या पिढीने डेव्हिड गॉवर पहिला नाही....पण आज त्यांनी सुद्धा प्रियांश याच्या पाठीवरुन कौतुकाची थाप दिली असती..इतके नयनरम्य फटके आज तो खेळून गेला...त्याला साथ दिली ती इंग्लिस याने जन्माने फक्त इंग्लिश असलेल्या हा खेळाडू ऑस्ट्रेलियन वृत्ती कॅरी करतो..त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर आल्यावर त्याने मुंबई च्या कुठल्याही गोलंदाजीवर दया दाखविली नाही.


११ व्या षटकात आलेल्या अश्विनी कुमारवर त्याने हल्ला चढविला...त्याच षटकात त्याने दोन चौकार रिव्हर्स स्कूप चे वसूल करून आपण आपल्या देशाच्या मॅक्सवेल चे खंदे समर्थक आहोत हे दाखवून दिले...आल्या आल्या त्याने मिड विकेट परिसरात आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुल चे चौकार मारून आपण पेंटिंग यांच्या पंथाचे वारकरी आहोत हे सुद्धा दाखवून दिले...इंग्लिस आणि प्रियांश यांनी आज आपल्या कामगिरीने एकत्रफी विजय मिळवून दिला.. काल पंजाब संघाचा  सांघिक विजय म्हणता येईल असा विजय होता..कालच्या विजयानंतर पंजाब संघ पहिल्या दोन मधे राहील हे नक्की..बंगळूर संघ जर विजयी ठरला तर पहिल्या लढतीत कधी ही स्पर्धा न जिंकणारा एक संघ अंतिम फेरीत दाखल होईल..स्पर्धा सुरू झाल्यापासून नव नवी ऐतिहासिक कामगिरी होत आहे...आज पंजाब संघाने  त्यांच्या मालकीण बाईंसमोर विजय मिळवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणले आहे...येत्या ३ जून रोजी जर स्पर्धेत श्रेयस आणि संघ जर अंतिम विजेतेपद मिळवू शकला तर अहमदाबाद मध्ये १८ वर्षानंतर पंजाब संघाचा विजयाबरोबर खरा प्रीतिसंगम होईल...आणि कदचित काल त्याची नांदी झाली आहे.


संबंधित लेख:


CSK vs GT IPL 2025: अहमदाबादमध्ये चेन्नई किंग