उंची छोटी पण काम मोठं..... पृथ्वीने जेव्हा टीम इंडियाकडून खेळायला सुरुवात केली तेव्हा सर्वांनीच कौतुक केले. प्रचंड प्रतिभा आणि क्षमता, आक्रमक फटक्यामुळे अल्पावधीतच पृथ्वी शॉ याने सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधले... पृथ्वीची फलंदाजी पाहून अनेकांनी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्याशी तुलना केली. पण आज पृथ्वी कुठेय... काय करतोय? का फ्लॉप जातोय? याचा कधी त्याने विचार केलाय का? 


मोबाईल जसा सतत अपग्रेड करावा लागतो... तसे आपल्यातील प्रतिभा आणि गुणांना नेहमीच अपग्रेट करत राहावे लागते. तुम्ही कोणतेही काम करा.... ते चांगले होण्यासाठी मेहनत घ्यावीच लागते.. त्यामध्ये वारंवार बदल करावा लागतो.. क्रिकेटचेही तसेच आहे.. तुम्हाला वारंवार सिद्ध करावे लागणारच... तुमच्या खेळात बदल करावाच लागणार आहे. सध्याच्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक फंलदाज कसा खेळतो, हे समजते... त्यानुसार प्रतिस्पर्धी संघ प्लॅनिंग करत असतो. आयपीएल तर व्यावसायिक स्पर्धा आहे. यामध्येही प्रत्येक सामन्यात स्वत:ला सिद्ध करावा लागते. जर धावा काढण्यात अथवा विकेट घेण्यात अपयश आले तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. पृथ्वी शॉ याच्यासोबतही असेच झालेय.. यंदाच्या आयपीएलमध्ये पृथ्वीला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. फारकाळ पृथ्वी मैदानावर थांबत नाही... पृथ्वीचा नेमका फॉर्म कुठे गेलाय...  याला पृथ्वी स्वत:च जबाबदार आहे.


खेळात नेटकेपणा, मानसिक स्वास्थ जपावेच लागते. पृथ्वी शॉ याला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली.. या प्रसिद्धीमुळे पृथ्वी हुरळून गेल्याचे दिसतेय. अंडर 19 विश्वचषक जिंकल्यानंतर पृथ्वीची दखल राष्ट्रीय मीडियाने घेतली होती. टीम इंडियाकडून पदार्पण केल्यानंतर त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते. असमान्य प्रतिभा आणि क्षमता असणारा पृथ्वी आता एका धावेसाठी झगडतोय... बॅड पॅच प्रत्येक खेळाडूच्या करिअरमध्ये येतोच.. पण त्यावर मात करावी लागते.. पृथ्वीने 2020 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. त्यानंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. शुभमन गिल याने टीम इंडियात स्थान पटकावले... तो आयसीसी रॅकिंगमध्येही आघाडीवर पोहचलाय.. दोघांचे क्रिकेट एकाच वेळी सुरु झालेले.. आज शुभमन कुठे पोहचलाय... अन् पृथ्वीला संघात स्थानही मिळत नाही. दुसरे उदाहरण घ्यायचे झाले तर अजिंक्य रहाणेचे घ्या... रहाणेचे टीम इंडियातील स्थान गेले... नेतृत्व गेले... पण रहाणेने नव्या उमेदीने पुनरागमन केले.. आताच्या घडीला आयपीएलमध्ये सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून रहाणेकडे पाहिले जाते.. रहाणे 33 वर्षाचा असतानाही अशाप्रकारे कमबॅक करु शकतो.. तर पृथ्वी शॉ का नाही... पृथ्वी शॉ याने अजिंक्य रहाणे, सौरव गांगुली,  युवराज सिंह आणि धोनी यासारख्या क्रिकेटरकडून शिकायला पाहिजे... क्रिकेटमध्ये कमबॅक कसे करायचे... अन्यथा पृथ्वीचे करिअर संपायला वेळ लागणार नाही.. 


पृथ्वी शॉ याला फिटनेसवरही लक्ष केंद्रीत करावे लागणार आहेत. पृथ्वी शॉ अद्रकासारखा कसाही सुटलाय. मैदानावर थांबण्यासाठी फिटनेस महत्वाची आहे. क्रिकेटपणे चपळता हवी असते.. त्यासाठी यो यो टेस्ट पास करावी लागते. विराट कोहली याने भारतीय क्रिकेटच्या फिटनेसचा दर्जा फुटबॉलसारखा करुन ठेवला आहे. आज टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू फिट दिसतोय.. यामध्ये पृथ्वी शॉकडे पाहावतही नाही.. त्यामुळे पृथ्वी शॉ याला फिटनेस सुधारावी लागणार आहे. त्यासाठी दिवसरात्र मेहनत घ्यावी लागणार आहे. डायट फॉलो करावा लागणार आहे. इतकेच नाही.. तर इमेजही सुधारावी लागेल.. सपना गिल प्रकरणानंतर प्रत्येकजण पृथ्वी वाया गेला असेच म्हणत आहे. सेल्फी वाद सध्या कोर्टात आहे. पृथ्वी युवा आहे... त्याच्याकडे वेळ आहे.... तोपर्यंतच त्याने आपल्यातील क्रिकेटला मरु देऊ नये.. पृथ्वीसोबत सध्या जे घडतेय... त्यामुळे अनेकांचे करिअर सुरु होण्याआधीच संपलेय... पृथ्वीकडे प्रतिभा आणि क्षमता असामान्य आहे... सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यासारख्या दिग्गजांसोबत तुलना केली गेली. पण त्याने हुरळून न जाता आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करावे.. स्वत:ला सिद्ध करावे. त्याने पुन्हा टीम इंडियासाठी क्रिकेट खेळावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे... पण पृथ्वी आपल्या क्रिकेट टॅलेंटला न्याय देतो का? हे येणारा काळच सांगेल.