Yearly Numerology 2025 Of Mulank 1 : नवीन वर्ष 2025 (New Year) अवघ्या काही दिवसांवर सुरु होणार आहे. हे नवीन वर्ष ज्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रात महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे अंकशास्त्रानुसार देखील कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष लकी असणार आहे हे आपण जाणून घेऊयात.
सर्वात आधी 2025 हे वर्ष मूलांक 9 दर्शवते. मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ ग्रह हा वर्चस्व स्थापित करणारा ग्रह मानला जातो. हा ग्रह साहस, संपन्नता, आग, ऊर्जा आणि क्रोध, आक्रमकतेचं प्रतिनिधीत्व करतो.
या ठिकाणी आपण मूलांक 1 असणाऱ्या लोकांबद्दल जाणून घेऊयात. सर्वात आधी ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 1 असतो. त्यामुळे 2025 हे वर्ष मूलांक 1 साठी कसं असेल ते जाणून घेऊयात.
कशी असेल लव्ह लाईफ? (Yearly Luv Life Numerology 2025)
या जन्मतारखेच्या लोकांची लव्ह लाईफ आव्हानात्मक असणार आहे. वैवाहिक जीवन, लव्ह लाईफसाठी हे वर्ष फारसं योग्य नसणार आहे. कारण, नवीन वर्षात तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल. पैसे कमावण्याच्या मार्गाकडे वळाल. त्यामुळे या सर्व गोष्टीला तुम्ही फारसा वेळ देऊ शकणार नाही. जर तुमचा विवाह झाला असेल तर तुमच्या पार्टनरच्या आरोग्याबाबत तुम्हाला चिंता सतावेल.
कसं असेल करिअर? (Yearly Career Numerology 2025)
करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, जे लोक चिकित्सा, स्पोर्ट्स, प्रशासन तसेच श्रमिक वर्गाशी संबंधित असतील त्यांना या काळात जास्त लाभ मिळणार आहे. नवीन डिग्री घेण्यासाठी हा काळ योग्य आहे.
कशी असेल आर्थिक स्थिती? (Yearly Wealth Numerology 2025)
आर्थिक स्थितीबाबत बोलायचं झाल्यास, तुमची आर्थिक स्थिती एकदम चांगली असेल. तुम्हाला जर नवीन वाहन, प्रॉपर्टी किंवा घर खरेदी करायचं असल्यास तुमच्यासाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. तुमचं घर खरेदी करण्याचं स्वप्न या वर्षात पूर्ण होऊ शकतं.
कसं असेल आरोग्य? (Yearly Health Numerology 2025)
आरोग्याच्या बाबतीत बोलल्यास, नवीन वर्ष तुमच्यासाठी स्वास्थ्य आणि ऊर्जा घेऊन येणारं असणार आहे. या नवीन वर्षात तुमचा आत्मविश्वास वाढेल. मात्र, सतत बाहेरच्या खाण्या-पिण्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :