World Soil Day 2023 : दरवर्षी 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन (World Soil Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश जीवनातील मातीचे महत्त्व समजून घेणे हा आहे. जीवनासाठी मातीचे संवर्धन आवश्यक आहे. हिंदू धर्मात मातीला (Soil) विशेष महत्त्व आहे, त्यामुळे अनेक उत्सव आणि विवाहांमध्ये मातीपूजेला महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथातही मातीचे महत्त्व सांगितले आहे.


मातीपासून बनवलेल्या वस्तू पाच घटकांचे प्रतीक


असे मानले जाते की, मातीपासून बनवलेल्या वस्तू वापरल्याने सकारात्मक उर्जेचा (Positive Energy)प्रसार वाढतो. कारण मातीला पंच तत्वांचे प्रतीक मानले जाते. याचे कारण असे की, जेव्हा मातीपासून काही बनवले जाते तेव्हा माती प्रथम पाण्यात वितळवली जाते, जे पृथ्वी तत्व (Earth) आणि जल तत्वाचे (Water) प्रतीक आहे. यानंतर त्याला एक विशेष आकार दिला जातो आणि सूर्याच्या किरणांत (Sun) आणि हवेत (Air) वाळवली जाते, जे आकाश आणि वायु घटकांचे प्रतीक आहे. यानंतर, शेवटी मातीची वस्तू आगीत (Fire) गरम करून मजबूत केली जाते, ती अग्नि तत्वाचे प्रतीक आहे. हेच कारण आहे की हिंदू धर्मात मातीच्या वस्तू शुद्ध मानल्या जातात आणि पूजेत वापरल्या जातात.


मातीपासून बनवलेल्या 'या' वस्तू मानल्या जातात शुभ



  • दिवा : पूजेसाठी वेगवेगळ्या धातूंनी बनवलेले दिवे वापरले जातात. पण मातीचा दिवा खूप शुभ आहे. मातीचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

  • मातीची मूर्ती : दिव्यांप्रमाणेच मातीपासून बनवलेल्या देवदेवतांच्या मूर्तीही हिंदू धर्मात शुभ मानल्या जातात. त्यामुळे नियमित पूजा आणि विशेष विधी करताना मातीच्या मूर्तीची स्थापना केली जाते.

  • मातीची कुंडी : जर तुम्ही तुमच्या घरात, अंगणात किंवा बाल्कनीमध्ये फुलांची रोपे लावत असाल तर फक्त मातीची कुंडी वापरा. हे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषत: तुळशीचे रोप मातीच्या कुंडीतच लावावे. कारण प्लास्टिक, लोखंड, सिमेंट किंवा इतर वस्तूंमध्ये तुळशीचे रोप लावणे शुभ नाही. असे केल्याने घरातील सुख-शांती भंग पावते.

  • घागरी किंवा मडके : थंड पाण्यासाठी घागरी किंवा मडके वापरतात. पण आरोग्यासोबतच घराच्या शुभ कल्याणासाठी मातीचे भांडे खूप शुभ असते. ज्या घरामध्ये मातीच्या भांड्यात पाणी ठेवले जाते ते घर सुखी राहते. परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की घागरी किंवा भांडे नेहमी पाण्याने भरलेले असले पाहिजेत, चुकूनही रिकामे ठेवू नका.

  • मातीची भांडी : घरात मातीची भांडी वापरणे शुभ मानले जाते. आरोग्यासाठी देखील मातीच्या भांडीत बनवलेले जेवण चांगले असते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shani Dev : 2024 मध्ये शनिची स्थिती 3 वेळा बदलणार; मेषसह 'या' राशींच्या लोकांचं उजळणार नशीब