Palmistry : ज्योतिष शास्त्रात हाताच्या रेषांचं देखील विशेष महत्त्व आहे. हस्तरेखा (Palmistry) शास्त्रानुसार, व्यक्तीच्या हाताच्या रेषा वाचून त्यांची लव्ह लाईफ, लग्न (Marriage), रिलेशनशिप, आरोग्य आणि करिअरचा अंदाज ओळखता येतो. तुमच्याही मनात अनेकदा हा विचार आला असेल की लग्न कधी होणार? कोणाबरोबर होणार? अरेंद मॅरेज होणार की लव्ह मॅरेज? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही हस्तरेखा शास्त्रावरून जाणून घेऊ शकता. 


हातावर लग्नरेषा कुठे असते? 


हस्तरेखा शास्त्रानुसार, हाताचं सर्वात छोट्या बोटाखाली आणि हृदय रेषेच्या वर हाताच्या बाहेरील बाजूस आतल्या मार्गाने जाणारी रेषाच तुमची लग्न रेषा असते. जेव्हा ही रेषा मोठी, स्पष्ट आणि रंगाने गडद होते तेव्हा ती शुभ मानली जाते. ज्या लोकांच्या हातावर अशी रेषा असते त्यांची लव्ह लाईफ, रिलेशनशिप फार रोमॅंटिक असते. अशा लोकांना चांगला जोडीदार भेटतो असं म्हणतात. तसेच, विवाह रेषेच्या शेजारी त्रिशूलचं चिन्ह फार शुभ मानलं जातं. 


कधी होणार लग्न?


मान्यतेनुसार, जर विवाह रेषा हृदय रेषेच्या जवळ असते तर व्यक्तीचं लग्न फार लवकर होण्याची शक्यता असते. तसेच, या लोकांना लव्ह लाईफमध्ये चढ-उतारांचा सामना करावा लागतो. जर तुमची लग्न रेषा छोट्या बोटापासून फार जवळच्या अंतरावर आहे तर याचा अर्थ असा होतो की तुमचं लग्न तिशीत किंवा तिशीच्या नंतर होण्याची शक्यता आहे. 


लग्नानंतर वाद केव्हा होतात? 


जर तुमच्या विवाह रेषेला दुसरी रेषा क्रॉस करत असेल तर याचा अर्थ तुमच्या विवाहास विलंब किंवा वाद होण्याची शक्यता आहे. तसेच, कुंडलीतल मंगळ ग्रहाच्या अशुभ स्थितीने देखील तुमच्या लग्नात अनेक अडथळे येण्याची शक्यता असते. 


लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? 


आयुष्यात तुमच्याही मनात अनेकदा हा विचार आला असेल की, आपलं लव्ह मॅरेज होणार आहे की अरेंज मॅरेज? जर तुमच्या विवाह रेषेची खूण असेल तर लव्ह मॅरेज होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर हाताचा शुक्र पर्वत जास्त असेल आणि स्पष्ट दिसत असेल तर तुमचं लव्ह मॅरेज होण्याची ही देखील एक शक्यता आहे. 


केव्हा होतो ब्रेकअप?


जर तुमची विवाह रेषा तुटक-तुटक किंवा रंगाने अगदी फिकट आणि स्पष्ट नसेल तर तुम्हाला आयुष्यात ब्रेकअपचा सामना करावा लागू शकतो. किंवा नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Astrology : कावळ्याची काव काव हाक देते 'हे' संकेत; जीवनाशी याचा नेमका संबंध काय? जाणून घ्या