What Do Dreams About Someone Dying Mean : बहुतेक प्रत्येक व्यक्ती स्वप्ने पाहतो. काही स्वप्न लक्षात राहतात, तर काही स्वप्न आपण विसरतो. काही स्वप्ने पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होतो, तर काही स्वप्ने पाहिल्यानंतर आपल्याला भीती वाटते. तसेच अनेक वेळा स्वप्ने पाहिल्यावर दचकून जागही येते. स्वप्न शास्त्रानुसार, आपण अनेकदा पाहत असलेली स्वप्ने सत्यात उतरत नाहीत. अनेक वेळा तुम्हाला स्वप्नात तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू दिसतो. स्वप्नात स्वत:चा किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू पाहिल्यास याचा अर्थ काय, हे जाणून घ्या.
स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे
स्वप्न शास्त्रानुसार (Swapna Shastra), जर तुम्ही स्वप्नात स्वतःचा मृत्यू (Death in Dream) झाल्याचं दिसलं तर तो अतिशय शुभ संकेत मानला जातो. तसेच, तुमचं आयुष्य वाढून आगामी काळात तुमच्यावर येणारं संकट टळलं आहे, असा याचा अर्थ मानला जातो. त्याशिवाय, तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो आणि तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. स्वप्नात स्वतःला आत्महत्या करताना पाहिल्यास त्याचा अर्थ तुमचं आयुष्य वाढलं आहे आणि तुमच्या भविष्यात तुम्हाला धनलाभ होईल.
स्वप्नात कुटुंबातील सदस्याचा मृत्यू पाहणे
जर तुम्हाला स्वप्नात तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू दिसत असेल तर ते त्या व्यक्तीसाठी ते शुभ मानलं जातं. त्या व्यक्तीचं आयुष्य वाढण्याचे हे संकेत आहेत. त्या व्यक्तीच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. एखादी व्यक्ती गंभीर आजारी असल्यास, ती व्यक्ती येत्या काही दिवसांत बरी होऊ शकतो. आगामी काळात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्नातही वाढ होऊ शकते. त्यामुळे असं स्वप्न पाहिल्यानंतर घाबरण्याचं कारण नाही.
स्वप्नात स्वतःला रडताना पाहणे
जर तुम्ही स्वप्नात स्वतःला रडताना पाहिलं, तर स्वप्न शास्त्रानुसार, हे शुभ आहे. याचा अर्थ येत्या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. त्याशिवाय, स्वप्नात स्वतःला स्मशानाच्या मध्यभागी पाहणं देखील शुभ मानले जाते, याचा अर्थ तुम्हाला लवकरच प्रमोशन मिळणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)