Weekly Lucky Zodiacs 1-7 January 2024 : सोमवारपासून नवीन वर्षाचा पहिला आठवडा सुरू होत आहे. या 5 राशींसाठी वर्षाचा पहिला आठवडा खूप भाग्यवान असेल, त्यांचे नशीब चमकेल. नवीन आठवडा सुरू होत आहे, हा आठवडा खूप चांगला आहे.. ज्योतिष तज्ज्ञांकडून जाणून घ्या, कोणत्या राशींसाठी हा आठवडा चांगला राहील? साप्तहिक राशीभविष्य जाणून घ्या...


वृषभ


वर्षाचा नवा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्याचा असेल.व्यावसाय करणाऱ्या लोकांना या आठवड्यात मोठा फायदा होईल. तुम्ही काही नवीन कामाची जबाबदारी घ्याल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. 1 जानेवारीपासून सुरू होणारा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात वृषभ राशीचे लोक संयम आणि दृढनिश्चयाने जीवनाच्या विविध क्षेत्रात यश मिळवतील. मेहनतीच्या जोरावर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम मिळवाल. या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या नात्यात खूप उत्कटता, रोमान्स आणि उत्साह पहाल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. समाजात मान-सन्मान वाढेल.


सिंह


सिंह राशीच्या लोकांसाठी वर्षाचा पहिला आठवडा शुभ देईल. तुम्हाला नक्कीच चांगली बातमी मिळेल. या आठवड्यात तुमच्यावर कामाच्या ठिकाणी काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मैत्रीचे नाते प्रेमात बदलेल.लव्ह लाईफ चांगले राहील. एकमेकांची कंपनी आवडेल. सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा रोमांचकारी असणार आहे. या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व उत्कृष्ट असेल. या आठवड्यात लोक तुमच्यामुळे खूप प्रभावित होतील. तुमच्यामध्ये नेतृत्व क्षमता वाढेल. ऑफिसमध्ये तुम्हाला एखादे महत्त्वाचे पद हाताळावे लागू शकते. या आठवड्यात तुमची उर्जा पातळी उच्च असेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे काम योग्य प्रकारे करू शकाल. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ आणि वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात.


कन्या


कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली राहील. या आठवड्यात विशेष व्यक्तीच्या मदतीने कामे पूर्ण होतील. हा आठवडा तुमच्यासाठी आश्चर्याने भरलेला असेल. पैशाची कमतरता दूर होईल. लव्ह लाईफ चांगली राहील.


धनु


धनु राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा भाग्याचा राहील. या आठवड्यात तुमच्या नशिबाचा तारा चमकेल. या आठवड्यात जुन्या मित्राची भेट होईल. कौटुंबिक सहकार्य तुमच्या सोबत राहील. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. नवीन वर्ष म्हणजे 2024 हे धनु राशीच्या लोकांसाठी खूप लकी वर्ष ठरणार आहे. व्यवसायात नफा होईल आणि काम केल्यास पगार वाढू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे आणि सर्व बाजूंनी पैसा येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले तर नवीन व्यवहार होतील आणि जुने रखडलेले आर्थिक वाद मिटतील.


मीन


या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना कोणाच्या तरी मदतीने व्यवसाय पुढे नेण्यात यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. प्रेम जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. आरोग्याची चांगली काळजी घ्या.


तूळ


साप्ताहिक राशीनुसार, या आठवड्यात तूळ राशीचे लोक त्यांच्या नेतृत्व क्षमतेने त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करतील. तुमच्या सामाजिक कौशल्याची मागणी वाढेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. तुमच्या जोडीदारासोबत तुमची समज आणि समन्वय वाढेल. तुमचे नाते सुधारण्याचा प्रयत्न कराल. या आठवड्यात तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही अनेक नवीन संधी मिळू शकतात.


कुंभ


या आठवड्यात कुंभ राशीचे लोक त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर त्यांचे नशीब उज्वल करण्यात यशस्वी होतील. लोकांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही इतरांना सहकार्य कराल. तुम्ही तुमच्या नवीन कल्पना लोकांना अवगत कराल. लोक तुमच्या प्रतिभेचा आदर करतील. या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांना अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी हा आठवडा चांगला राहील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Weekly Horoscope 1-7 January 2024 : नववर्ष 2024 चा पहिला आठवडा 'या' राशींसाठी लाभदायक! 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या