Weekly Horoscope 9 To 15 June 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा आठवडा काहींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. या ठिकाणी आपण सिंह आणि कन्या राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे. या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत. 

सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - सिंह राशीच्या लोकांची लव्ह लाईफ चांगली असेल. तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही क्वालिटी टाईम स्पेन्ड कराल. तसेच, तुम्ही तुमच्या पार्टनरला छान भेटवस्तू देखील देऊ शकता. या आठवड्यात पार्टनरचा विश्वास संपादन करायचा असेल तर ऐकण्याची आणि भावना समजून घेण्याची तयारी ठेवा. 

करिअर (Carrer) - सिंह राशीच्या करिअरबाबत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. कामाप्रती तुमचं प्रेम आणि समर्पण दिसून येईल. तसेच, क्रिएटिव्ह गोष्टी करण्यावर तुमचा भर असेल.

आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. मात्र, पैशांचा विनाकारण वापर करु नका. गरजूंना वेळीच मदत करा.

आरोग्य (Health) - नवीन आठवड्याच्या कामाच्या बाबतीत जितके तुम्ही प्रामाणिक असाल तितकीच आरोग्याचीही काळजी घ्या. एखादा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - कन्या राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात आपल्या पार्टनरला वेळ देणं गरजेचं आहे. नात्यात गैरसमज वाढवू देऊ नका.  तुमची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवा.

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या डेडलाईनवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा देखील तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, ज्येष्ठांचं मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचं ठरेल.

आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सामान्य असणार आहे. तुम्हाला ना लाभ ना तोटा होणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहाल. तसेच, विनाकारण पैसे खर्च करु नका.

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, चांगलं हेल्दी रुटीन फॉलो करा. संतुलित पोषणावर लक्ष द्या. तसेच, प्रोटीनचा आहारात समावेश करा. तसेच, आरोग्याची काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:  

Weekly Horoscope 9 To 15 June 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जून महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य