Weekly Horoscope 9 To 15 June 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, लवकरच जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा आठवडा काहींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. या ठिकाणी आपण मिथुन आणि कर्क राशीसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे. या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत.
मिथुन रास साप्ताहिक राशीभविष्य (Gemini Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - मिथुन राशीच्या लोकांची लव्ह लाईफ चांगली चालेल. या आठवड्यात जे लोक सिंगल आहेत त्यांना चांगला लाईफ पार्टनर भेटण्याची शक्यता आहे. मात्र, कोणताही निर्णय घेताना घाईत घेऊ नका. नीट विचार करा.
करिअर (Carrer) - मिथुन राशीच्या करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्ही मल्टीटास्किंगमध्ये काम कराल. तुमच्या कामाला प्राधान्य द्याल. तसेच, नवीन कल्पना शक्तीचा वापर करुन क्रिएटिव्हली काम कराल.
आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. नियमितपणे खर्चावर नियंत्रण ठेवा. आणि भविष्यासाठी पैसे कुठे गुंतवता येतील याचा रिसर्च करा.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, संतुलित दृष्टीकोनासह तुम्ही नियमित योग आणि व्यायाम करणं गरजेचं आहे. यासाठी पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. मानसिक शांतीसाठी योग करा.
कर्क रास साप्ताहिक राशीभविष्य (Cancer Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - कर्क राशीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, पार्टनरबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. या दरम्यान तुमच्यात चांगला संवाद साधेल. इमोशनल बॉन्ड स्ट्रॉंग राहील.
करिअर (Career) - नवीन आठवड्यात तुम्हाला करिअरमध्ये आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. यासाठी आधीपासूनच मानसिक तयारी ठेवा. तरुणांसाठी करिअरचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिकदृष्ट्या काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागू शकतात. अशा वेळी न डगमगता आत्मविश्वासाने निर्णय घ्या. तसेच, विनाकारण पैसे खर्च करु नका.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या. कामाचा जास्त ताण घेऊ नका. याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: