Weekly Horoscope 6 To 12 October 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबरचा (October 2025) नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या काळात शनिच्या नक्षत्र परिवर्तनासह (Shani Nakshatra Parivartan) अनेक ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे अनेक राशींसाठी ऑक्टोबरचा नवीन आठवडा महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला कामकाजात सहकाऱ्यांची चांगली साथ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. प्रवास करण्याचे काही चांगले योग येतील. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, सामाजिक कार्यात तुमचं सहकार्य वाढलेलं दिसेल. तुमचं आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं असेल. यासाठी नियमित दिनश्चर्या फॉलो करा.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तसेच, या आठवड्यात तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी कराल. तसेच, तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला मिळतील. वैवाहिक जीवनात चांगली सुधारणा झालेली दिसेल. भौतिक सुख-सुविधांचा लाभ घ्याल.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी ऑक्टोबरचा नवीन आठवडा फार अनुकूल असणार आहे.तसेच, काही निर्णय घेताना समजुतीने आणि नीट विचारपूर्वक घेण्याची गरज आहे. नवीन विचार शिकायला मिळतील. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. घरात आनंदी वातावरण असेल. तसेच, व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. कामाच्या तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात स्थिरता दिसून येईल. तसेच, या आठवड्यात मानसिक आरोग्याची देखील काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात तुम्ही नवीन गोष्टीची सुरुवात करताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र, आठवड्याच्या शेवटी पैशांची बचत करा. अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा काहीसा संवेदनशील असणार आहे. काही समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागेल. नवीन गोष्टींचा अनुभव घ्यायला मिळेल. तसेच, कुटुंबातील लोकांसाठी हा काळ फार आनंददायी असेल. या काळात तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घ्याल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला लाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :