Continues below advertisement


Weekly Horoscope 6 To 12 October 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबरचा (October 2025) नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. 6 ते 12 ऑक्टोबर 2025 हा आठवडा (Weekly Horoscope) अत्यंत खास असणार आहे. नवीन आठवड्यात काही महत्त्वाच्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे. त्यामुळे नवीन आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मेष रास (Aries Weekly Horoscope)


लव्ह लाईफ (Love Life) - मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा तुमच्या जोडीदाराशी किंवा प्रेम जोडीदाराशी जुळवून घेण्यात काही अडचणी येऊ शकतात. जास्त अपेक्षा तुम्हाला अस्वस्थ करू शकतात. संवाद आणि समजूतदारपणा समस्या सोडवेल.


करिअर (Career) - जर तुम्ही नोकरी करत असाल तर कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहणे महत्वाचे आहे. ते तुमच्या कामात अडथळा आणू शकतात किंवा तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात. वरिष्ठ आणि हितचिंतकांकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने तुम्हाला नैराश्य येऊ शकते.


आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत तुमचा नवीन आठवडा थोडी काळजी घेण्याची गरज आहे. फसवणूक होण्याची शक्यता, नियोजन करूनच व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या बाबींमध्ये पुढे जा.


आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, मानसिक ताण आणि चिंता टाळा. संतुलित आहार आणि नियमित दिनचर्या राखणे आवश्यक आहे. हलका व्यायाम आणि पुरेशी झोप फायदेशीर ठरेल.


वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)


लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुमची लव्ह लाईफ ठीक असेल, नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि संयम ठेवा. आठवड्याच्या सुरुवातीला काही मतभेद असू शकतात, परंतु संवाद आणि सहकार्यामुळे परिस्थिती सुधारेल.


करिअर (Career) - नोकरीत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, आपल्या ध्येयाला घेऊन तुम्ही प्रामाणिक राहा. विरोधकांपासून सावध राहा, या आठवड्यात तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतील. वादविवादांपासून दूर राहा.


आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगा. अनिश्चित परिस्थितीत पैसे गुंतवणे टाळा. खर्च करताना तुमच्या आर्थिक बाबींकडे लक्ष द्या, अन्यथा तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागू शकतात.


आरोग्य (Wealth) - ऑक्टोबर महिन्याच्या नवीन आठवड्यात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. संतुलित आहार घ्या. आठवड्याच्या उत्तरार्धात हंगामी आजारांपासून सावध राहा.


हेही वाचा :           


Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑक्टोबरचा नवा आठवडा नशीब पालटणारा! कसा असेल आठवडा? साप्ताहिक राशीभविष्य


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)