Shani Nakshatra Parivartan 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, दसऱ्यानंतरच (Dasara 2025) कर्मफळदाता शनीचं (Shani Dev) सर्वात महत्त्वाचं आणि मोठं संक्रमण होणार आहे. 3 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजेच आज शनीचं नक्षत्र परिवर्तन (Shani Nakshatra Parivartan) होणार आहे. त्यामुळे काही राशींना याचा चांगलाच लाभ मिळणार आहे. 

Continues below advertisement


ज्योतिष शास्त्रानुसार, 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसरा साजरा केल्यानंतर त्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी शनी नक्षत्र परिवर्तन करणार आहे. शनिचा पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश होणार आहे. याचा स्वामी देवगुरु बृहस्पती आहे. शनी तब्बल 27 वर्षांनंतर पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे शनिच्या या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मकर राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच शनिच्या होणाऱ्या या संक्रमणाने या राशीच्या लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तसेच, तुम्हाला व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला या काळात वेळेत पूर्ण करता येतील. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने मकर राशीवर देखील सकारात्मक परिणाम दिसून येतील. या काळात नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. तसेच, जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. जुने वाद असतील तर ते लवकरच मिटतील. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिचं हे नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्ही नवीन योजनांचा लाभ घ्याल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, उत्पन्नात चांगली वाढ होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :       


Horoscope Today 3 October 2025 : आज देवी लक्ष्मीच्या कृपेने 5 राशींचं होणार चांगभलं; समोर आलेलं संकट टळेल, मिळतील 'हे' संकेत, आजचे राशीभविष्य