Weekly Horoscope 6 To 12 May 2024 : मे महिन्याचा दुसरा आठवडा फार खास असणार आहे. या आठवड्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन तर करणारच आहेत पण त्याचबरोबर अनेक राजयोग देखील बनणार आहेत. त्यामुळे अनेक राशींसाठी हा आठवडा खास असणार आहे. मेष ते मीन राशीसाठी नवीन आठवडा नेमका कसा असणार आहे यासाठी साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) अधिक माहिती जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीसाठी हा काळ फार व्यस्त जाईल. पण, प्रत्येक कामात तुमची प्रामाणिकता दाखवा. या आठवड्यात तुमच्या हातून काही चांगलं काम घडण्याची शक्यता आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की, कधीही कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आपल्या निर्णयावर ठाम राहा. दोन दगडांवर पाय ठेवू नका. यामुळे तुमची निर्णयक्षमता कमकुवत राहील. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीसाठी नवीन आठवडा फार चांगला जाणार आहे. या दरम्यान तुम्हाला नवीन गोष्टी उमजत जातील. कामाच्या ठिकाणी प्रमोशन किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, मित्रांचा सहभाग तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मित्राची साथ तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. कधी तुम्ही आनंदी असाल तर कधी निराश. त्यामुळे स्वत:ला कामात जास्तीत जास्त व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात सुद्धा प्रगतीची शक्यता आहे. फक्त मन लावून काम करा. इतरांच्या बोलण्यावर लगेच प्रभावित होऊ नका. 


कर्क रास (Cancer Horoscope)


हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठा फार संघर्षमय असणार आहे. यासाठी तुमच्या गोपनीयतेची काळजी घ्या. तुमची गोष्ट तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा. सगळ्यांना तुमच्या आयुष्यात काय घडतंय याबाबत सांगू नका. तसेच, भावनिक राहून कोणताही निर्णय घेऊ नका. यामुळे तुमचंच नुकसान होईल. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तसेच, पैशांची गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कोणावरही चुकून विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीसाठी नवीन आठवडा शुभदायक असणार आहे. गेल्या अनेत दिवसांपासून रखडलेली तुमची कामे या आठवड्यात पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही खूप समाधानी असाल. तसेच, व्यवसायात देखील तुमची चांगली प्रगती दिसून येईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बनतोय दुर्लभ संयोग! 'या' राशींवर असणार शनीची कृपा, एकामागोमाग मिळतील शुभवार्ता