Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मेष रास (Aries Weekly Horoscope)


सोमवारपासून सुरू होणारा नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरेल. या काळात तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. या आठवड्यात तुमच्या कामाचं कौतुक होईल, हा आठवडा केवळ करिअरमध्येच नाही, तर व्यवसायातही चांगला राहील. या आठवड्यात तुमचा कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. कुटुंबात एकता राहील. प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल.


वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात कामात सावध राहावं. एक छोटीशी चूक तुमच्यासाठी महागात पडू शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर तिथे तुमचं काम इतरांवर सोपवू नका. या आठवड्यात तुम्हाला अचानक मोठा खर्च करावा लागू शकतो. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद चालू असेल तर तो अधिक गंभीर होऊ शकतो. मन आणि राग या दोन्हींवर नियंत्रण ठेवत एक एक गोष्टी साध्य करता येतील.


मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यशाचा ठरेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील विस्ताराचं नियोजन प्रत्यक्षात येताना दिसेल. प्रेम संबंधात सुसंगतता असेल आणि तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत अधिकाधिक आनंददायी क्षण घालवू शकाल.


कर्क रास (Cancer Weekly Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाईल. या आठवड्यात तुमच्या काही महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात. चुकीच्या संगतीपासून लांब राहा. आरोग्याशी कोणत्याही प्रकारे खेळू नका. या आठवड्यात कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. तुम्ही व्यवसाय करत असाल तर या आठवड्यात काही गोष्टींवर विशेष लक्ष द्या. या आठवड्यात तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होऊ शकता.


सिंह रास (Leo Weekly Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. तुम्हाला प्रत्येक पावलावर यश आणि सन्मान मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. मित्रांच्या पाठिंब्याने तुमचे बहुतेक नियोजन यशस्वी होईल आणि तुमची कीर्ती वाढेल.


कन्या रास (Virgo Weekly Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. पण या आठवड्यात तुम्हाला घाई टाळावी लागेल. कोणतेही नियम किंवा कायदे मोडू नका. कार्यालयात विरोधकांपासून सावध राहा. तुमच्या कामात लोक अडथळे निर्माण करू शकतात किंवा कोणाच्याही फसवणुकीत अडकू नका, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक