Weekly Horoscope 30 June To 06 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिना संपून लवकरच जुलै महिन्याला सुरुवात होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात आषाढी एकादशीबरोबरच (Ashadhi Ekadashi) अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत. त्यामुळे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी जुलै महिन्याचा पहिला आठवडा चांगला असणार आहे. या महिन्यात तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, उत्पन्नाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास काहीसे चढ-उतार दिसतील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळे. या काळात तुमच्या भोवती घडणाऱ्या गोष्टींचं निरिक्षण करा. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. या आठवड्याच अनेक चांगल्या गोष्टीही घडतील. तसेच, काही गोष्टींचा सामनाही करावा लागणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा आहे. अनेक नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. त्यामुळे तुम्ही व्यस्त असाल. मित्र-परिवाराकडून एखादी शुभवार्ता तुम्हाला ऐकायला मिळेल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या काळा त तुमच्या व्यवसाय अगदी सुरळीत चालेल. आठवड्याच्या शेवटी थोडी धनहानी होऊ शकते. मात्र, याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार नाही. तसेच, या आठवड्यात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तसेच, तुमच्या भावना व्यक्त करु नका. तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी जुलै महिन्याचा पहिला आठवडा चांगला असेल. या आठवड्यात तुमचा ना फायदा ना तोटा होणार आहे. या दरम्यान कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील कामे तुमची लवकर पूर्ण होतील. तुमच्या कामासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाही. तसेच, पार्टनरबरोबर तुम्ही छानशा ठिकाणी फिरायला जाऊ शकता.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या आठवड्यात प्रवासाचे योगदेखील जुळून येणार आहेत. त्यामुळे मित्र-मैत्रींणींना भेटता येईल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवा. तसेच, भगवान गणेशाची तुमच्यावर कृपा असणार आहे.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
नवीन आठवड्यात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, कार्याचा विस्तार वाढलेला दिसेल. या आठवड्यात अनेक संकटं देखील येतील. मात्र, याचा तुम्ही सामना करण्यास सक्षम असाल. तसेच, तुमच्या शत्रूंपासून दूरच राहा. जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. आठवड्याच्या शेवटी कोणतीही मोठी रिस्क घेऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :