Angarak Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांची स्थिती ठराविक वेळेच्या अंतराने बदलते. हे ग्रह मिळून अनेख शुभ-अशुभ योग निर्माण करतात. याचा मानवी जीवनाबरोबरच जगभरात परिणाम पाहायला मिळते. जुलै महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे आणि महिन्याच्या सुरुवातीलाच तब्बल 28 दिवसांसाठी अंगारक योग बनणार आहे. सिंह राशीत मंगळ (Mars) आणि केतू (Ketu) ग्रह मिळून हा अंगारक योग निर्माण करणार आहेत. त्यामुळे या कारणासाठी अनेक राशींच्या संकटात वाढ निर्माण होऊ शकते. या योगामुळे व्यक्तीच्या आरोग्याबरोबरच धनहानीही होऊ शकते. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी अंगारक योग फार नुकसानकारक आहे. या राशीच्या लग्न भावात हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे या काळात तुमचा स्वभाव फार रौद्र असू शकतो. तुमची छोट्या-छोट्या कारणांवरुन चिडचिड होऊ शकते. यासाठी या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. तुमचे निर्णय फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यवसायात देखील नुकसान सहन करावं लागेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अंगराक योग फार प्रतिकूल ठरु शकतो. या काळात तुमचे दिर्घकालीन आजार तुम्हाला पुन्हा उद्भवू शकतात. तसेच, या राशीच्या कर्म भावात हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या कामकाजावर याचा परिणाम दिसून येईल. तुमच्या नोकरीत तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागेल. तसेच, या काळात वाहन चालवताना काळजी घ्या. काही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी अंगारक योगाचा काळ फार नुकसानकारक ठरु शकतो. या राशीच्या अष्टम भावात हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काहीतरी दुखापत होऊ शकते. तसेच, तुम्हाला आर्थिक नुकसानीचा देखील सामना करावा लागेल. ब्लड प्रेशरशी संबंधित तुम्हाला समस्या होऊ शकतात. या काळात कोणतीही महत्त्वाची जोखीम हाती घेऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: