Weekly Horoscope 29 September To 5 October 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर (September) महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहे. ऑक्टोबर महिना लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. तसेच, हा आठवड्यात शारदीय नवरात्रौत्सव आणि दसरा असणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरचा हा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी या आठवड्यात तुमचे संघर्ष आता दूर होऊ शकतात. या काळात संतुलन राखणे, शहाणपणाचे निर्णय घेणे आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद स्थापित करणे महत्त्वाचे असेल. तुमचे संवाद कौशल्य आणि दृष्टिकोन तुम्हाला अनेक नव्या संधी देतील. आर्थिक बाबतीत सक्षम व्हाल. परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल. आठवड्याची सुरुवात थोडी मंदावलेली असली तरी, आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे तुम्ही अधिक स्थिर असाल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी या आठवड्याची सुरुवात काही गोंधळ आणि निर्णयांमध्ये होऊ शकते, परंतु आठवड्याच्या मध्यापर्यंत गोष्टी स्पष्ट होऊ लागतील. आणि तुमच्या सर्व गोष्टी हळूहळू मार्गाला लागतील. यासाठी तुमचा आत्मविश्वास, शिस्त आणि आत्मनिरीक्षण आवश्यक असेल. तुम्हाला मानसिक स्थिरता अनुभवायला मिळेल आणि जीवनाशी संबंधित अनेक समस्यांवर गंभीरपणे विचार करता येईल. तुमचे मन कधीकधी चिडचिडेपणा किंवा अस्वस्थतेचा परिणाम होऊ शकतो, म्हणून संवाद साधताना संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्या
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल, अचानक नशीब पालटण्याची शक्यता आहे, सकारात्मक ऊर्जा, आर्थिक लाभाचे संकेत आणि वैयक्तिक वाढ असू शकतो. तुमचा आत्मविश्वास आणि आशावादी दृष्टिकोन या आठवड्यात विशेषतः सक्रिय असेल. तुम्ही जीवनाबद्दल एक नवीन दृष्टिकोन स्वीकारू शकता आणि अधिक लक्ष केंद्रित करून तुमच्या ध्येयांकडे वाटचाल करू शकता. आठवड्याची सुरुवात काही गोंधळ किंवा मानसिक संघर्षाने होऊ शकते, परंतु आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे तुमचे निर्णय स्पष्ट आणि प्रभावी होतील.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल. जबाबदाऱ्या आणि ध्येयांसाठी वचनबद्धतेचा आठवडा असेल. तुमचे व्यावहारिक विचार आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन तुम्हाला अनेक आव्हानांवर सहजतेने मात करण्यास सक्षम करेल. पैसा यायला सुरूवात होईल. आठवड्याची सुरुवात काही कौटुंबिक आणि व्यावसायिक दबावांनी होऊ शकते, ज्याचा तुमच्या मानसिक आणि शारीरिक उर्जेवर परिणाम होईल, परंतु तुमचे ध्येयावर लक्ष अढळ राहील..
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा हा नवीन विचार, सामाजिक संवाद आणि आत्मनिरीक्षणाचा काळ आहे. तुमच्या आर्थिक बाबींकडे नीट लक्ष द्या. अन्यथा फसवणूक होऊ शकते. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीद्वारे तुमच्या कामात नवीनता आणू शकता. आठवड्याच्या सुरुवातीला काही गोंधळ किंवा अनिर्णय असू शकतो, परंतु हळूहळू तुम्ही परिस्थिती स्पष्टपणे पाहू शकाल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा हा आत्मनिरीक्षण, बुद्धिमत्ता आणि उर्जेने भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल, सहज सर्व गोष्टी हाताळू शकाल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. तुमचा आतील आवाज अधिक मजबूत होईल आणि तुम्ही तुमच्या सभोवतालच्या परिस्थिती खोलवर समजून घेण्यास सक्षम असाल. जीवनातील अनुभवांमधून शिकल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होऊ शकतात. पैसा येईल, फक्त नीट खर्च करा. आठवड्याची सुरुवात काही मानसिक गोंधळाने होऊ शकते, परंतु हळूहळू, आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या विचारात स्पष्टता येईल.
हेही वाचा :
Weekly Horoscope: सप्टेंबरचा शेवट, ऑक्टोबरची जबरदस्त सुरूवात! पुढचा आठवडा कोणासाठी लकी? कोणासाठी टेन्शनचा? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)