Weekly Horoscope 25 To 31 August 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक सण समारंभांसह मोठ मोठ्या ग्रहांची देखील स्थिती बदलणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष (Aries Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - मेष राशीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास,  प्रेमसंबंधांमध्ये नवीन सुरुवात होऊ शकते. विवाहितांसाठी वेळ चांगला आहे, तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल.

करिअर (Career) - या आठवड्यात करिअरमध्ये प्रगतीचे स्पष्ट संकेत मिळतील. ज्या प्रकल्पांवर तुम्ही बराच काळ मेहनत करत होता त्यांना अनुकूल परिणाम मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी, विशेषतः नवीन गुंतवणूक आणि भागीदारीच्या बाबतीत वेळ चांगला आहे.  

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल, तसेच जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल.

आरोग्य (Health) - आरोग्य चांगले राहील, परंतु हवामानातील बदलामुळे सर्दी आणि खोकल्याची समस्या उद्भवू शकते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हर्बल टी प्या आणि व्यायाम करा.

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - प्रेमाच्या बाबतीत तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नाते अधिक गोड होईल. अविवाहित लोकांसाठी चांगले नातेसंबंध येऊ शकतात.

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत नोकरदारांना पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत आहेत. मोठ्या प्रकल्पात तुमची भूमिका महत्त्वाची असेल.हा आठवडा आर्थिक आणि करिअरच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी अनुकूल राहील. व्यवसायात नफ्याच्या नवीन संधी मिळतील.

आर्थिक स्थिती (Wealth) - हा आठवडा नवीन संधी आणि आव्हानांचा संतुलित काळ असेल. कठोर परिश्रम चांगले परिणाम देतील, परंतु घाई टाळावी लागेल. नवीन स्रोत शोधता येतील. छोट्या छोट्या मुद्द्यांवरून वाद टाळा. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल, अनावश्यक खर्च टाळणे योग्य राहील. 

आरोग्य (Wealth) - या आठवड्यात आरोग्य सामान्य राहील, परंतु तेलकट पदार्थ खाणे टाळा. घशाच्या समस्या किंवा अ‍ॅलर्जी टाळा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :           

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)