Weekly Horoscope 21 To 27 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै महिन्याचा चौथा आठवडा उद्यापासून सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक ग्रह नक्षत्रांचं परिवर्तन होणार आहे. तसेच, अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत. त्यामुळे सर्व 12 राशींसाठी (Zodiac Signs) नवीन आठवडा कसा असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी नवीन आठवडा फार खास असणार आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चांगले बदल घडताना दिसतील. तसेच, तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टींचा अनुभव घ्याल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी नवीन आठवडा फार चांगला असणार आहे. या कालावधीत तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. तसेच, समाजात तुमचा मना सन्मान वाढलेला दिसेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
या आठवड्यात तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुमच्या प्रयत्नांना पूर्ण यश मिळेल. तसेच, हाती घेतलेलं काम पूर्ण होईल. तुमचं आरोग्य छान राहील. नवीन वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या कालावधीत तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. वैवाहिक जीवन चांगले राहील. तसेच, धार्मिक स्थळी तुमचं मन जास्त रमेल. फिरायला जाण्याच्या अनेक संधी निर्माण होतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात नोकरीच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. तसेच, अनेक रखडलेली कामेही तुम्ही पूर्ण करु शकता. भौतिक सुख-संपत्तीचा तुम्ही लाभ घ्याल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. इलेक्ट्रॉनिक वाहनाची खरेदी करु शकता. तसेच, नवीन गोष्टी येण्याबरोबरच काही गोष्टी हातातून सुटतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, मित्रांचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला मिळेल. कामाच्या संदर्भात तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या काळात तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, वाहन खरेदीची तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. कामाची नवीन अनुभूती मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी जुलैचा नवीन आठवा संवेदनशील असणार आहे. या काळात तु्म्ही वाहन खरेदी करु शकता. तसेच, नवीन नोकरीची संधी मिळेल. आई-वडिलांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असेल. त्यामुळे चिंता करु नका.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा भाग्यशाली असणार आहे. या काळात मुलांचं अभ्यासात मन रमेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. कोणत्याही गोष्टीची जोखीम घेण्यासाठी तुम्ही डगमगणार नाहीत.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या बॉसकडून कामाचं कौतुक केलं जाईल. कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण झालेलं दिसेल. वेळेत कामे पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :