Lucky Zodiac Signs 21 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या 21 जुलै 2025 चा दिवस आहे. उद्याचा दिवस भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित आहे. तसेच, या दिवसापासून नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. तसेच, या दिवशी अनेक छोट्या-मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ योगदेखील निर्माण होणार आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस कोणत्या 5 राशींसाठी (Zodiac Signs) शुभ असणार आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभ असणार आहे. तसेच, उद्यापासून नवीन आठवड्याची सुरुवात होणार आहे. या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. तसेच, कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण झालेलं दिसेल. तसेच, गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. उद्याचा शुभ रंग क्रिम कलर तसेच, शुभ अंक 6 असणार आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी उद्यापासून नवीन आठवड्याची सुरुवात होणार आहे. या काळात नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, कामाच्या निमित्ताने तुमची ट्रान्सफर होऊ शकते. मुलांसाठी उद्याचा दिवस फार शुभ असणार आहे. धार्मिक कार्यात तुमचं मन जास्त रमेल. उद्याचा शुभ रंग मोती कलर तर लकी अंक 2 असणार आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभ असणार आहे. या काळात नशिबाची साथ तुमच्याबरोबर असणार आहे. तसेच, आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे. सामाजिक क्षेत्रात तुमचा विकास झालेला दिसेल. जर तुम्हाला नवीन प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. उद्यासाठी तुमचा लकी रंग सोनेरी तसेच, तुमचा लकी अंक 1 असणार आहे. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीसाठी उद्याचा दिवस भाग्याचा असणार आहे. भगवान शंकराची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. उत्पन्नाच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. तसेच, भगवान शंकराच्या कृपेने तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. उद्याचा लकी रंग पिवळा तर लकी रंग 3 असणार आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी उद्याचा दिवस भाग्याचा असणार आहे. या काळात तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. नवीन योजनांचा तु्म्ही लाभ घ्याल. उद्याचा लकी रंग निळा आणि लकी नंबर 7 असणार आहे. 

Raksha Bandhan 2025 : भावांनो, यंदाच्या रक्षाबंधनाला करा बहिणींचं रक्षण; धनसंपत्ती आणि भरभराटीसाठी सर्व 12 राशींनुसार फॉलो करा 'हे' खास उपाय आणि मंत्र