Weekly Horoscope 21 To 27 April 2025 : एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे अनेक राशींसाठी हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमचा व्यवसाय चांगला चालेल. सरकारी नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. तसेच, व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आठवड्याची सुरुवात फार चांगली होईल. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थोडे जास्त कष्ट करावे लागतील. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. मुलांचं अभ्यासात मन रमेल. तसेच, जर तुम्हाला वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा शुभ योग असेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा सकारात्मक असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमची नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. तसेच, जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ फार शुभ असणार आहे. भविष्यासाठी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या मित्र-परिवाराबरोबर तसेच, नातेवाईकांबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमच्या व्यवसायावर तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागेल. कामाच्या बाबतीत कोणताच हलगर्जीपणा करु नका. तसेच, तुमच्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी नवीन आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, आठवडा चांगला जाण्यासाठी नियमित योगासन आणि ध्यान करा. तुमची कामे वेळेत पूर्ण करा आणि वेळेवर झोपा. एखादं काम पूर्ण न झाल्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी एप्रिलचा नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. तसेच, तुम्ही आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. मुलांच्या बाबतीत कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. तसेच, वाहन चालवताना काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी घरात नातेवाईक येण्याची शक्यता आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या आठवड्यात तुमचं आरोग्य अगदी ठणठणीत असेल. त्वचेचा कोणता विकारही जाणवणार नाही. तसेच, आठवड्याच्या मध्यात तुम्हाला कामानिमित्त एखादी शुभवार्ता मिळू शकते. मुलांच्या कलागुणांना देखील चांगला वाव मिळेल. ग्रहांच्या संक्रमणामुळे जुळून येणारा योग तुमच्यासाठी फार शुभ असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमचा व्यवसाय चांगला सुरळीत चालेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा नेमका कसा असणार? लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक