Saptahik Rashi Bhavishya 17 To 23 March 2024 : आर्थिक वर्षाचा आणि हिंदू कॅलेंडरकनुसार शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना सुरू आहे. या महिन्यात अनेक महत्त्वाचे ग्रह आपले राशी बदलणार आहेत. हे बदल वेगवेगळ्या राशीच्या लोकांवर परिणाम करतील. अनेक राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळतील, तर अनेक राशीच्या लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 17 ते 23 मार्च दरम्याना काळ तुमच्यासाठी भरभराटीचा असेल. मेष, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअर आणि आरोग्याबाबत विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. 17 ते 23 मार्च 2024 दरम्यानचं सर्व राशींचं साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया. (Aries to Virgo March Weekly Horoscope 2024)
मेष (Aries Weekly Horscope)
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सुरुवातीला थोडा खर्चिक राहील. परंतु आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती नियंत्रणात राहील आणि शुभ परिणाम दिसून येतील. या आठवड्यात तुम्ही वाहन खरेदी करण्याचा किंवा मालमत्ता विकत घेण्याचा विचार करत असाल तर फायदेशीर आहे. पैशाच्या बाबतीत हा आठवडा थोडा चढ उताराचा असणार आहे. पैशाची कमतरता भासणार नाही. या आठवड्यात जोडीदाराकडूनही चांगले सहकार्य अपेक्षित आहे आणि मुलांकडूनही शुभ परिणाम ऐकायला मिळतील. खांदा आणि हात दुखण्याची शक्यता आहे.
वृषभ ( Taurus Weekly Horscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणार आहे. हा आठवडा चढउताराचा असणार आहे. या आठवड्यत तुम्हाला नवीन प्रवास करावा लागू शकतो आणि तुम्ही अनावश्यक वादात अडकू शकता. कार्यक्षेत्रात प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे आणि नशीबही तुमच्या बाजूने असेल. वडिलांच्या मदतीने तुम्ही मोठी कामे पूर्ण कराल आणि मुलांबाबत काही चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिथुन (Gemini Weekly Horscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासून कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार काही मोठे काम करण्याचा विचार करत असेल, तर त्यात त्याला किंवा तिला पाठिंबा द्या, नंतर तुम्हाला शुभ परिणाम दिसून येतील. आठवड्याच्या शेवटी काही खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमचे पैसे विचारपूर्वक खर्च करा.
कर्क (Cancer Weekly Horscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा संपूर्ण आठवडा चांगला जाणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक कामात यश मिळेल आणि पैशाच्या बाबतीतही लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि शैक्षणिक क्षेत्रातही प्रगतीची दाट शक्यता आहे. सैन्य आणि पोलीस क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा विशेष फायदेशीर ठरणार आहे. ज्यांची न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत त्यांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo Weekly Horscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु आठवड्याचा शेवट लाभदायक असणार आहे.यावेळी अनपेक्षित परदेश प्रवास किंवा दूरच्या प्रवासाची शक्यता निर्माण होईल. तुमच्या जोडीदाराबाबत काही मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाद टाळण्याचा प्रयत्न करा. घसा आणि पोटाचे आजार उद्भवण्याची शक्यता आहे. तुमच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या.
कन्या (Virgo Weekly Horscope )
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अशुभ असणार आहे. पैशाची कमतरता भासेल. वाहनाशी संबंधित कोणतीही चिंता तुम्हाला त्रास देऊ शकते. वाहन चालवताना निष्काळजीपणे वागू नका आणि तुमचे वाहन इतर कोणाच्याही हाती देऊ नका, अन्यथा मोठे नुकसान होईल. जोडीदाराबाबत काही वाद संभवतात. गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय घेणे योग्य होणार नाही.
तूळ (Libra Weekly Horscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा आहे. आठवड्याची सुरुवातीसा भांडणे होण्याची शक्यता आहे. कर्ज घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजीपूर्वक विचार करूनच पैशांचा व्यवहार करा. दूरचे प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा किंवा पदोन्नती इत्यादी संधी मिळतील आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील.
वृश्चिक (Scorpio Weekly Horscope )
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आठवड्याचा सुरुवातीला तणाव असेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन आणि मालमत्तेशी संबंधित काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहील. तरीही यकृताच्या संसर्गाबाबत काळजी घेण्याची गरज आहे.
धनु (Sagittarius Weekly Horscope )
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सुरुवातीला शिक्षणासाठी चांगला असून धार्मिक कार्य पूर्ण करण्याच्या चांगल्या संधीही मिळतील. आठवड्याच्या मध्यभागी काही भांडणे आणि वाद होतील. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. तुमच्या जोडीदारासाठी आठवडा फायदेशीर राहील आणि कार्यक्षेत्रातही विशेष प्रशंसा मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या आठवड्यात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. पैसे मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.
मकर (Capricorn Weekly Horscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. कोणतेही शुभ कार्य आठवड्याच्या मध्यभागी पूर्ण होतील. तुमच्या जोडीदाराची प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रातही लोकांना चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी खर्च वाढेल.
कुंभ (Aquarius Weekly Horscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सर्व दृष्टीकोनातून फायदेशीर असणार आहे. आठवड्यात नियोजित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला अचानक कुठून तरी पैसे मिळू शकतात. परंतु आठवड्याच्या शेवटच्या भागात डोकेदुखी किंवा डोळा दुखणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. म्हणून, काही प्रकरणांमध्ये शांत राहणे चांगले. शिक्षणासाठी थोडा संघर्ष करावा लागेल.
मीन (Pisces Weekly Horscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा संपूर्ण आठवडा चांगला जाईल. या आठवड्यात मोठ्या नफ्याच्या संधी मिळतील. तुमच्या जोडीदाराकडून आर्थिक लाभ होईल आणि मुलांकडूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीचे काम करणाऱ्या लोकांना प्रॉपर्टी डीलिंगची संधी मिळेल आणि कामाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होईल. वाहनातून कमाई करणाऱ्या लोकांना हा आठवडा लाभ देणारा आहे. परदेशात राहणाऱ्या लोकांसाठीही चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात भावंड आणि मित्रांशी काही वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाद टाळण्याचा प्रयत्न करा.
हे ही वाचा :
Holashtak 2024: होळीच्या आठ दिवस अगोदर 'होलाष्टक', आठ दिवस केले जात नाही कोणतेही शुभ कार्य, काय करावे काय करु नये?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)