Holashtak 2024:  यंदा 24 मार्च रोजी होळी (Holi) साजरी केला जाणार आहे. होळीच्या अगोदर होलाष्टक सुरू होणार आहे. होळीच्या अगोदर आठ दिवस म्हणजे 17 मार्चपासून होलाष्टक सुरू होणार आहे. होलाष्टकात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. होलाष्टक हा शब्द होळी आणि अष्टक असे दोन शब्द मिळून तयार झाला. होलाष्टकचा काळ हा अशुभ मानले जाते. फाल्गुन अष्टमी ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंत (17 ते 24 मार्च)  होलाष्टक सुरू होणार आहे.जाणून घेऊय या काळात काय केले पाहिजे आणि काय नाही. 


होलाष्टाकमध्ये कोणतेही शुभ कार्य जात नाही. होलाष्टकाचा काळ हा सुतकाचा काळ समजला जातो.  या कालावधीत कोणतेही शुभ कार्य केले  जात नाही. होलाष्टकात भगवान श्रीकृष्णाची भक्ती केले जाते. भक्ती आणि उपासनेच्या दिवशी हा काळ शुभ मानला जातो. श्रीकृष्णाची भक्ती केली जाते. विवाह, मुंज, नामकरण, वास्तूशांती, गृहप्रवेश  असे शुभ कार्य केले जात नाही. होलाष्टात शुभ कार्य करण्यास मनाई असली तरी  पुजा, व्रत उपसना करणे शुभ मानले जाते. 


होलाष्टकात शुभ कार्य का केले जात नाही?


ज्योतिषांच्या मते, होलाष्टकाच्या वातावरण हे नकारात्मक असते. तसेच सर्व ग्रहांचा परिणाम नकारात्मक होतो.  अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी , एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरू , त्रयोदशी बुध, चतुर्थदशी मंगळ आणि पौर्णिमेला राहू हे सगळे ग्रह नकारात्मक असतात. या वातावरणाचा परिणाम व्यक्तीच्या विचार करण्याच्या क्षमतेवर होतो. त्यामुळे तुम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता दाट आहे.  या काळात शुभ कार्य केले जात नाही. ग्रहांच्या नकारात्मक प्रभावामुळे सहकार्य मिळत नाही. अशा वेळी तुमचे काम बिघडू शकते.


होलाष्टकात काय करु नये?


होलाष्टकात कोणताही नवा व्यवसाय किंवा दुकान सुरू करू नये. कोणतेही नवी वस्तू विकत घेत नाही. विशेषत:सोने, चांदी देखील खरेदी केली जात नाही. तसेच होम, हवन, यज्ञ करण्यास देखील मनाई असते.  


होलाष्टकात काय करावे?


धार्मिक मान्यतेनुसार, होलाष्टकादरम्यान भगवान हनुमान, भगवान विष्णू आणि भगवान नरसिंह यांची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात. तसेच, होलाष्टकच्या आठ दिवसांमध्ये व्यक्तीने सतत महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


Holi 2024 : एक, दोन नाही तर तब्बल 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण; सर्वात जास्त भाग्यशाली ठरतील या चार राशी