Weekly Horoscope 15 To 21 December 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर (December 2025) सध्या सुरु आहे. लवकरच डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. हा आठवडा अनेकांचे भाग्य बदलणार आहे. कारण या आठवड्यात गुरु, शुक्र ग्रहांसह अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन आणि संक्रमण करणार आहेत. त्यामुळे हा नवा आठवडा अनेक राशींसाठी भाग्यशाली असणार आहे. डिसेंबरचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या आरोग्याची स्थिती चांगली असेल. तसेच, व्यवसायाच्या दृष्टीने तुम्ही ज्या काही योजना राबवाल त्या यशस्वी होतील. घरात तुमच्या सुख शांती नांदेल. आठवड्याच्या शेवटी जर तुम्हाला घर किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य आहे. सूर्यदेवाला जल अर्पण करा. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीसाठी नवीन आठवडा काहीसा सामान्य असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. पण तुमच्या कामात तुमचं मन रमणार नाही. काहीतरी नवीन करण्याची इच्छा जागृत होईल. तुमच्यात आत्मविश्वास भरपूर असेल. फक्त निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहू नका. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी डिसेंबरचा तिसरा आठवडा शुभकारक असणार आहे. या कालावधीत तुम्हाला अनेक शुभवार्ता मिळेल. शत्रूंवर तुमची नजर असेल. या आठवड्यात तुम्ही जी काही कामे ठरवली आहेत ती वेळेत पूर्ण होतील. अनेक प्रवासाचे देखील योग जुळून आले आहेत. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाचा शुभ परिणाम या राशीवर पडताना दिसतोय. घरात आनंदी वातावरण राहील. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा चढ-उतारांचा असणार आहे. या काळात तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीची चिंता सतावत राहील. तुमच्या कामात मन रमणार नाही. तसेच, आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे पैशांचा अतिवापर करु नका. गुंतवणुकीकडे लक्ष द्या. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुमच्या कोणाकडूनच काहीच अपेक्षा नसतील. तुमच्या कामाशी तुम्ही पूर्णपणे प्रामाणिक असाल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, पार्टनरबरोबर तुमचे खटके उडू शकतात. अशा वेळी वाद जास्त वेळ ताणू नका. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात फार चांगली असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. बॅंक बॅलेन्स देखील दुप्पट होईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात धनसंपत्तीची बरकत राहील. या काळात तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील. तसेच, लवकरच धार्मिक यात्रेला जाण्याचे योग जुळून येत आहेत. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Budh Vakri 2026 : नवीन वर्षात होणार छप्परफाड कमाई! बुध ग्रहाची तब्बल 3 वेळा वक्री चाल; 'या' राशींवर पैशांचा पडणार धो-धो पाऊस