Budh Vakri 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्षात अनेक ग्रह वक्री (Budh Vakri) आणि मार्गी होणार आहेत. या सर्व ग्रहांमध्ये बुध ग्रहाचं देखील महत्त्वाचं स्थान आहे. खरंतर, 2026 मध्ये बुध ग्रह 69 दिवसांपर्यंत वक्री चाल चालणार आहेत. द्रिक पंचांगानुसार, बुध ग्रह 15 मार्च 2026 रोजी वक्री चाल चालणार आहेत. त्यानंतर 18 जुलै 2026 रोजी बुध ग्रह वक्री चाल चालणार आहे. त्यानंतर वर्षाच्या शेवचटी म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी बुध ग्रह वक्री होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला बुद्धी, लेखन, वाणी, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेचा कारक ग्रह मानतात. 2026 मध्ये बुध ग्रह तीन वेळा वक्री होणार आहे. यामुळे अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
नवीन वर्षात बुद ग्रह तब्बल 3 वेळा वक्री चाल चालणार आहे. या काळात तुम्ही काही नवीन योजना राबवू शकता. ज्या कामात गिरंगाई येत होती ती कामे वेळेत पूर्ण होतील. तसेच, जर तुम्हाला नोकरीत बदल करायचा असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या काळात घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. बिझनेसमध्ये प्रत्येक काम विचारपूर्वक करा. वाणीत कायम गोडवा ठेवल्यास चार माणसं जोडली जातील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
बुध ग्रहाची वक्री चाल मिथुन राशीच्या लोकांसाठी फार लाभदायी ठरणरा आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतली. नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, समाजात चांगला मान-सन्मान मिळवाल. तुमची रखडलेली कामे तुम्ही या वेळेत पूर्ण करु शकता. तसेच, पैशांची गुंतवणूक करताना त्यातून तुम्हाला लाभ मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची वक्री चाल फार रचनात्मक असणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. समाजा तुमची चांगली ओळख निर्माण होईल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. जोडीदाराबरोबरचा रुसवा दूर होईल. मुलांचं शिक्षणात मन रमेल. तसेच, जर तुम्हाला तुमची कला जपायची असेल किंवा एखादा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी हा काळ योग्य आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)