Weekly Horoscope 15 To 21 December 2025: डिसेंबर 2025 महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा आठवडा अनेकांचे भाग्य बदलणार आहे. कारण या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे हा नवा आठवडा अनेक राशींसाठी भाग्यशाली असणार आहे. डिसेंबरचा तिसरा आठवडा तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

Continues below advertisement

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. नोकरीत महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि तुम्हाला जुने मित्र भेटू शकतात. तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही तुमच्या नोकरीत प्रगती करू शकता, घरात शुभ घटना घडू शकतात. या आठवड्यात जुने वाद मिटतील आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये नफा मिळू शकतो. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. नवीन व्यक्तीशी संपर्क फायदेशीर ठरू शकतो. कौटुंबिक समस्या सुटतील आणि प्रवासाच्या संधी निर्माण होतील. तुम्हाला जुने मित्र भेटतील. उत्पन्न क्षेत्रातही फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील मतभेद दूर होतील आणि तुम्ही मोठी गुंतवणूक देखील करू शकता. 

Continues below advertisement

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी डिसेंबरचा तिसरा आठवडा चढ-उतारांनी भरलेला असेल. आर्थिक अडचणी उद्भवू शकतात आणि तुम्हाला मदतीची आवश्यकता असू शकते. या आठवड्यात काही काम बिघडू शकते, ज्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. वादांमुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. मालमत्तेचे वाद होण्याची शक्यता आहे. विरोधक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी हा आठवडा अडचणींनी भरलेला असेल. आर्थिक परिस्थितीत चढ-उतार येतील आणि कुटुंबात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या आठवड्यात तुमचे पैसे अनावश्यक कामांवर खर्च होऊ शकतात. लांब प्रवासामुळे तुम्हाला कुटुंबापासून दूर राहावे लागू शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी डिसेंबरचा तिसरा आठवडा हा आठवडा चांगला राहील. तुम्ही एखाद्या विशिष्ट कामाबद्दल उत्साही असाल आणि यश मिळवाल. व्यवसायाची परिस्थिती चांगली असेल आणि विरोधकांचा पराभव होईल. घरात आनंदी वातावरण असेल आणि शुभ घटना घडू शकतात. या आठवड्यात तुम्हाला उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक-राजकीय क्षेत्रात तुम्हाला आदर मिळेल. नवीन व्यवसाय सुरू होऊ शकतो

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवडा चांगला राहील. नवीन काम सुरू होऊ शकते आणि कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी निर्माण होतील. या आठवड्यात नवीन कामाच्या योजना आखल्या जाऊ शकतात. कामात चांगला समन्वय राहील आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता देखील आहे. या आठवड्यात तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता देखील मिळू शकते. 

हेही वाचा

Navpancham Rajyog 2025: पैसा..नोकरी..फ्लॅट..12 डिसेंबरपासून 3 राशींचे नशीबाचे फासे पालटले! शक्तिशाली नवपंचम योग, संपत्तीचा मार्ग मोकळा करणार

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)