Weekly Horoscope 13 To 19 October 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबर (October 2025) महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण या दरम्यान बुध आणि शुक्र ग्रहाचा शुभ संयोग जुळून येणार आहे. तसेच, आठवड्याच्या शेवटी दिवाळीचा (Diwali 2025) देखील सण आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुमच्या नात्यात रोमँटिक स्पार्क वाढेल. जे लोक सिंगल आहेत त्यांची एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते. अशा वेळी नातेसंबंधात जवळीकता निर्माण होण्याची शक्यता आहे.
करिअर (Career) - तुमच्या कामाच्या बाबतीत तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. वरिष्ठांचा विश्वास मिळेल. नवीन प्रोजेक्ट्समध्ये तुमचा परफॉर्मन्स कौतुकास्पद ठरेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक दृष्ट्या आठवडा स्थिर आहे. मात्र, अचानक खर्च होऊ शकतो. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खिशाला कात्री लागू शकते.
आरोग्य (Health) - नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप तुमच्यासाठी आवश्यक आहे. पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे.
वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या आठवड्यात तुमच्या जुन्या नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतील.
करिअर (Career) - करिअरमध्ये मोठी प्रगती दिसून येईल. कामाच्या बाबतीत आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट हातात घेणं लाभदायक ठरेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - दिवाळीच्या दरम्यान तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.
आरोग्य (Wealth) - नवीन आठवड्यात तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येईल. मात्र, त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. भरपूर पाणी प्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :