Weekly Horoscope 13 To 19 October 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबरचा (October 2025) तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे.  या आठवड्यात बुध आणि शुक्राचा शुभ संयोग तयार होत असून, चंद्राचा प्रवेश कर्क राशीत होणार आहे. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. तसेच, आठवड्याच्या शेवटी दिवाळीचा (Diwali 2025) उत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीसाठी ऑक्टोबरचा नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या आठवड्यात तुमचं भाग्य तुमच्या मेहनतीला साथ देणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील.  खुलतील. काहींना नवी जबाबदारी किंवा पदोन्नती मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. एकमेकांमध्ये संवाद निर्माण होईल. मात्र, आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. थकवा जाणवू शकतो.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीसाठी नवीन आठवड्याची सुरुवात उत्साही असेल. बुध-शुक्र संयोगामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.घरात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. मात्र, अनावश्यक खर्च टाळा. मात्र, आठवड्याच्या शेवटी दिवाळी असल्या कारणाने तुमचा खर्च वाढू शकतो. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा आणि संयम गरजेचा आहे. तसेच, तुमच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. त्वचेसंबंधी विकार जाणवू शकतो.  

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी काही नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी नवं प्रोजेक्ट किंवा भागीदारी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थोडा मानसिक थकवा जाणवू शकता. यासाठी कामात गुंतून राहू नका. स्वत:साठी थोडा वेळ काढा. तसेच, मित्र-परिवाराला भेट द्या. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवड्याची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. जोडीदाराशी नातं अधिक दृढ होईल. पण आठवड्याच्या शेवटी चंद्राच्या स्थितीमुळे भावनात्मक अस्थिरता येऊ शकते. अशा वेळी ध्यान किंवा विश्रांती घेणं फायद्याचं ठरेल. तसेच, पैशांचा जपून वापर करा. विनाकारण पैसे खर्च करु नका. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी ऑक्टोबरचा तिसरा आठवडा काहीसा संमिश्र असणार आहे. या काळात तुम्हाला करिअर घडविण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल. मात्र, घरातील वाद-विवादात शांतता राखा. दिवाळीचा सण तुमच्यासाठी गेमचेंजर असणार आहे.  आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः रक्तदाब आणि थकवा जाणवणार नाही याची काळजी घ्या. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे.  बुध-शुक्र योग तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. आर्थिक बाबतीत लाभ मिळू शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पना मान्य होऊ शकतात. तसेच, जर तुम्हाला नवीन कार्याची सुरुवात करायची असल्यास हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. हलका ताण जाणवू शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Horoscope Today 10 October 2025 : आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 5 राशींना पावणार गणराया; संकट समोर येताच मिळतील 'हे' संकेत, आजचे राशीभविष्य