Weekly Horoscope 22-28 April 2024 : मे महिन्याचा तिसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. वृश्चिक आणि मकरसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. मे महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


तूळ रास (Libra)


तूळ राशीचा नवीन आठवडा गंमतीचा जाणार आहे, तुम्ही या आठवड्यात काही साहसी उपक्रमांत भाग घ्याल. तुमचे कुटुंब एखाद्या सहलीचं नियोजन करू शकतं, जेथे तुम्ही नवीन क्रियाकलापांमध्ये गुंताल, जे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असेल. या आठवड्यात मित्र किंवा नातेवाईकांना पैसे देणं टाळा, कारण तुम्हाला ते परत करताना नाकेनऊ करतील.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य असेल. या आठवड्यात रोमांचक असं काहीही घडणार नाही. निराशा टाळण्यासाठी आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवा, कुणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. आरोग्याशी संबंधित समस्यांवर तुम्ही अनपेक्षितपणे काही पैसे खर्च करू शकता.


धनु रास (Sagittarius)


या आठवड्यात तुम्हाला काही नवीन संधी साधून येतील, ज्याचा तुम्ही योग्य फायदा करुन घ्याल. तुम्ही थोडं हुशारीनेच वागा, कारण असे क्षण वारंवार येत नाहीत. तुम्ही मिळालेली संधी वेळीच साधा. या आठवड्यात तुमचा तुमच्या जोडीदाराशी मोठा वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अनावश्यक वाद टाळण्याचा प्रयत्न करा.


मकर रास (Capricorn)


या आठवड्यात तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु तुम्ही सर्व समस्या हुशारीने हाताळाल. या आठवड्यात काही आर्थिक समस्या उद्भवू शकतात आणि अशा वेळी आपल्या पालकांकडून मदत घेणं, हा एकच पर्याय असू शकतो. घटस्फोटित लोक संभाव्य नातेसंबंधांसाठी नवीन आणि मनोरंजक व्यक्तींना भेटू शकतात.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ परिणाम देणारा ठरेल. मागील गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरासाठी नवीन वस्तू खरेदी करता येतील. दान, आशीर्वाद प्राप्ती आणि मानसिक शांतीसाठी हा आठवडा योग्य असेल. तुम्ही जितकं पुण्याचं काम कराल तितकं चांगलं फळ तुम्हाला प्राप्त होईल.


मीन रास (Pisces)


करिअरच्या दृष्टीने मीन राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मक आणि फलदायी परिणाम घेऊन येईल. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. तथापि, प्रत्येकजण आपल्या यशाबद्दल आनंदी असू शकत नाही. व्यावसायिकांना नवीन आठवड्यात चांगला नफा मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या