Weekly Horoscope 13 To 19 January 2025 : आजपासून नवीन आठवडा सुरु झाला आहे.  जानेवारीचा तिसरा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. या आठड्यात काही राशींना लाभ मिळणार आहे. तर, काही राशींना तोटा होणार आहे. एकूणच जानेवारीचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊया.


मेष रास (Aries Weekly Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्यावर थोडं लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. व्यवसायात चांगली वाढ झालेली दिसेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला पैशांची थोडी चणचण जाणवेल. तसेच, थंडीचे दिवस असल्याने सकस आहार घ्या.


वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार झालेला दिसेल. तसेच, या काळात पैशांची गुंतवणूक करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे.


मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष केंद्रित करावं. तसेच, तुम्हाला धार्मिक यात्रेत सहभागी व्हायचं असल्यास ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडलेले दिसतील.


कर्क रास (Cancer Weekly Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे.या आठवड्यात तुमच्याकडून अनेकांच्या अपेक्षा असतील. त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तसेच, वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला सर्दी, खोकला, घसादुखीचा त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी तुमच्याकडून जास्त पैसे खर्च केले जाऊ शकतात. यासाठी जपून पैशांचा वापर करा.


सिंह रास (Leo Weekly Horoscope)


डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही. तसेच, या काळात तुम्हाला धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे. तुमचं मन अध्यात्माकडे जास्त असेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. 


कन्या रास (Virgo Weekly Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तुम्हाला तुमच्या उत्पन्नातून अधिक लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमची रखडलेली कामे लवकरच पूर्ण होतील. मानसिक शांततेसाठी तुम्ही नियमित ध्यान, योगासन करा. 


तूळ रास (Libra Weekly Horoscope) 


तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्वतःला सिद्ध करणारा असेल. या काळात तुम्हाला काही विशेष कामात यश मिळू शकतं, परंतु यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. मानसिक तणाव टाळण्यासाठी स्वतःला सकारात्मक ठेवा. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन जबाबदारी मिळू शकते. मात्र, वेळेच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावं लागेल. प्रेमसंबंधांमध्ये थोडे तणाव जाणवतील, त्यामुळे जोडीदाराशी संवाद कायम ठेवा.


वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)


वृश्चिक राशीसाठी हा आठवडा शुभ राहील. तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात, विशेषतः करिअर आणि आर्थिक बाबतीत शुभ परिणाम मिळतील. या आठवड्यात तुम्ही तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरून यश मिळवू शकता. कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील. नवीन प्रोजेक्टवर काम करत असाल तर त्यात यश मिळू शकतं. प्रेमसंबंधांमध्ये चांगले बदल दिसतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल.


धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आव्हानांनी भरलेला असू शकतो. तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात, परंतु तुम्ही संयम राखलात तर सर्व अडचणी सोडवू शकाल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. काही बदलांमुळे तुमच्यावर ताण येऊ शकतो, परंतु तुम्ही ते चांगल्या प्रकारे हाताळू शकता. लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर, लव्ह लाईफमध्ये काही मतभेद असू शकतात, परंतु तुमच्यात परस्पर समंजसपणा वाढेल.


मकर रास (Capricorn Weekly Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शांततापूर्ण राहील. तुमचं लक्ष तुमच्या कामात चांगले परिणाम मिळवण्यावर असेल. तुम्ही काही नवीन कल्पना घेऊन पुढे जाऊ शकता आणि काही सकारात्मक बदल देखील होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. जुनी कामे मार्गी लावण्याची वेळ आली आहे. प्रेमसंबंधांमध्ये आनंद आणि स्थिरता राहील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवू शकाल.


कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)


कुंभ राशीसाठी हा आठवडा यशाचा असेल. या आठवड्यात तुम्ही नवीन योजना आणि कल्पना साकार करू शकाल. करिअर आणि कौटुंबिक जीवनात संतुलन राखणं तुमच्यासाठी हा आठवडा महत्त्वाचा असेल. कामाच्या बाबतीत काही विशेष संधीचा फायदा घेऊ शकता. पण लक्षात ठेवा की विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांच्या भावनांचा आदर करा. तुमच्या नात्यात गोडवा वाढेल.


मीन रास (Pisces Weekly Horoscope)


मीन राशीसाठी हा आठवडा प्रगतीचा असेल. तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात, विशेषत: तुम्ही कोणत्याही कला क्षेत्रात काम करत असाल कर चांगले परिणाम मिळतील. तुमच्या विचारांचं कौतुक होईल. कामाच्या बाबतीत यश मिळेल. काही नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकता. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर समंजसपणा वाढेल. एखाद्या गोष्टीबद्दल तणाव असेल तर तो सोडवला जाऊ शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Budh Yuti 2025 : 11 जानेवारीपासून 3 राशींना सोन्याचे दिवस; नवीन नोकरीच्या संधी येणार चालून, धनात होणार अपार वाढ