Shani Budh Yuti 2025 : सर्व ग्रह विशिष्ट काळानंतर राशी बदलतात, ज्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो. त्यात बुध हा एकाग्रता, बौद्धिक क्षमता, शिक्षण, व्यवसाय, तर्क इत्यादींचा कारक मानला जातो. अशा स्थितीत बुधाच्या राशी बदलामुळे 12 राशीच्या लोकांना या क्षेत्रांत नक्कीच काही परिणाम पाहायला मिळतील. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध 11 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12:41 वाजता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच कुंभ राशीमध्ये शनि देखील स्थित आहे, ज्यामुळे दोन्ही ग्रह एकत्र येतील आणि त्यांची युती होईल. या युतीचा मोठा फायदा 3 राशींना होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
या राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीची युती खूप फायदेशीर ठरेल. बुध-शनि युतीमुळे मिथुन राशीच्या लोकांच्या सुखसोयी आणि ऐषोरामात झपाट्याने वाढ होईल. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल किंवा परदेशात जावं लागेल. पण यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. नशिबाच्या साथीमुळे तुम्हाला व्यवसायात एखादी मोठी ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळू शकेल. आर्थिक लाभाचीही पूर्ण शक्यता आहे. यासोबतच तुम्ही संपत्ती वाढवण्यातही यशस्वी होऊ शकता. तुमचं लव्ह लाईफ चांगलं असणार आहे.
सिंह रास (Leo)
सिंह राशीमध्ये बुध आणि शनीचा संयोग सप्तम भावात होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनावर चांगला परिणाम पडू शकतो. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं तर, तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुकही होऊ शकतं. सिंह राशीच्या लोकांना आता त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू शकतं. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यताही खूप आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं अधिक घट्ट होईल.
तूळ रास (Libra)
बुध आणि शनीची युती या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या राशीच्या लोकांचा धार्मिक कार्यात अधिक कल असेल. यासह, तुम्ही अनेक धार्मिक यात्रा देखील करू शकता. तुमचा आत्मविश्वास वेगाने वाढेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामात मोठं यश मिळवता येईल. व्यापार आणि शेअर मार्केटशी संबंधित व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीतही तुम्ही लकी सिद्ध होऊ शकता. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. यासोबतच तुमचं आरोग्य चांगलं राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: