Weekly Horoscope 12 To 18 May 2025 : मे महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. त्यामुळे मे महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास साप्ताहिक राशीभविष्य (Aries Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - लव्ह लाईफच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या नात्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करा. पार्टनरबरोबर संवाद साधा. तसेच, एकमेकांच्या कामाला प्रोत्साहन द्या. 

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास. तुमच्यातील प्रोडक्टिव्हीटी या आठवड्यात दिसून येईल. तुमचं जे ध्येय आहे ते तुम्हाला गाठता येईल. तुमच्या कामाचं कुठेच प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करु नका.

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. पैशांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, कोणालाही पैसे उधार देऊ नका. पैशांच्या बाबतीत कोणाची फसवणूक करु नका. 

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास वेळीच त्यावर उपचार घ्या. आरोग्याच्या बाबतीत कोणताच हलगर्जीपणा करु नका.

वृषभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Taurus Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - जे लोक सिंगल आहेत ते आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर फिलिंग्स शेअर करु शकतात. तसेच, बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करा.

करिअर (Career) - व्यवसायाच्या दृष्टीने तुमचा चांगला कल असेल. टीम वर्कमध्ये काम करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. चांगल्या परफॉर्मन्सकडे भर द्या.

आर्थिक स्थिती (Wealth) - कुटुंबियांना पैशांचं पाठबळ द्या. भावा-बहिणीच्या गरजेला उभे राहा. महिलांनी पैशांची गुंतवणूक करावी.

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत कोणतीच वाईट सवय लावून घेऊ नका. तसेच, वेळेत जेवा आणि वेळेत झोपा. तरच तुमचं आरोग्य चांगलं राहील. निरोगी जीवनशैली जपा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:         

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी मे महिन्याचा नवीन आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य