Weekly Horoscope 11 To 17 August 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा नेमका कसा असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. या आठवड्यात काही शुभ ग्रहांचं देखील संक्रमण होणार आहे. श्रावण देखील सुरु आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उत्तम असेल, या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवीन संधी तुमच्याकडे चालून येतील. जुन्या प्रकल्पांना गती मिळेल. आर्थिक बाबतीत नफा होण्याची शक्यता आहे, परंतु अधिक खर्च टाळा. पैसे वाया घालवू नका, कुटुंबात आनंद राहील आणि आरोग्य सुधारेल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. व्यवसायात नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा सन्मान मिळू शकेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. हुशारीने गुंतवणूक करा. कमी अंतराचा प्रवास शक्य आहे, जो फायदेशीर ठरेल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी नवीन आठवडा मिश्रित परिणाम देणारा असेल. तुम्हाला कामात कठोर परिश्रम करावे लागतील, तर परिणाम हळूहळू येतील. तुम्हाला मित्रांकडून मदत मिळू शकते. खाण्यात काळजी घ्या आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी नवीन आठवडा काहीसा लय भारी ठरु शकतो. प्रेम संबंध दृढ होतील. व्यवसायात नफा मिळण्याच्या संधी मिळतील. कुटुंबात शुभ कार्य घडू शकतात. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल राहील. आरोग्य सामान्य राहील.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी ऑगस्टचा नवीन आठवड्याची सुरुवात आव्हानांनी होईल, परंतु मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने येईल. तुम्हाला अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन प्रकल्प किंवा कामासाठी योजना बनवता येईल.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. परदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रशंसा आणि यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील. आरोग्यात थोडे चढउतार संभवतात, योग आणि ध्यान तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
हेही वाचा :
Weekly Horoscope 11 To 17 August 2025: ऑगस्टचा दुसरा आठवडा कसा जाणार? कोणासाठी भाग्यशाली? कोणासाठी टेन्शनचा? 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)